News Flash

कार्तिक आर्यन म्हणतो, “मी उठू की लॉकडाऊन लागणार आहे?”

इन्स्टाग्रामवर शेअर केली भन्नाट पोस्ट

देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः महाराष्ट्रातली करोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाही. अशा परिस्थितीत प्रशासन खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा विचार करत आहे. मात्र, अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. राज्यातल्या सर्वच नागरिकांच्या मनात लॉकडाऊनबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. अभिनेता कार्तिक आर्यनच्या मनातही असाच संभ्रम आहे आणि त्याने भन्नाट पद्धतीने तो व्यक्त केला आहे.

कार्तिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तो फारच कंटाळलेला आणि आळसावलेला दिसत आहे. जणू तो झोपेतून नुकताच उठला आहे असं वाटत आहे. त्याने चेहऱ्यावर हात ठेवला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “उठू की लॉकडाऊन होणार आहे?” या कॅप्शनमध्ये त्याने जांभई देतानाचा इमोजीही पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

त्याच्यावर त्याच्या चाहत्यांनीही त्याला भन्नाट रिप्लाय दिले आहेत. एक युजर म्हणतो, “अरे किती झोपशील?” तर अजून एक युजर म्हणत आहे, “उठ आणि लाईव्ह ये म्हणजे आमचाही जरा टाईमपास होईल.”

कार्तिकला काही दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली होती. आता तो करोनातून बरा झाला आहे. लवकरच त्याचा ‘भूलभूलैय्या २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट अभिनेता अक्षय कुमारच्या ‘भूलभूलैय्या’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. यात कार्तिकसोबत अभिनेता राजपाल यादव आणि अभिनेत्री किआरा अडवाणीही दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 4:39 pm

Web Title: kartik aryan is asking whether i should wake up or there will be lockdown vsk 98
Next Stories
1 ‘बिग बुलचा चांगला रिव्ह्यू देण्यासाठी अभिनेत्रीला पैसे दिले का?’ म्हणणाऱ्याला अभिषेकचे भन्नाट उत्तर
2 RRR सोबतच प्रभासच्या ‘राधे श्याम’चे दुसरे पोस्टर प्रदर्शित
3 “कोणत्या झोपडपट्टीतून आणलंय मुलीला?”,असं म्हणणाऱ्यांना मंदिराने फटकारलं!
Just Now!
X