News Flash

…आणि म्हणून कार्तिक आपल्या नव्या गाडीच्या पाया पडला!

कार्तिकचा व्हिडिओ होत आहे सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने नुकतीच नवी गाडी खरेदी केली आहे. त्याची चांगलीच चर्चा सध्या होत आहे. त्याच्या गाडीसोबतच त्याचंही बरंच कौतुक सुरु आहे. त्याने एक लक्झरी कार खरेदी केली आहे. शिवाय यासाठी भरपूर पैसाही खर्च केला आहे. याच गाडीसोबतचा त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कार्तिकने नुकतीच लॅम्बॉर्गिनी URUS या आपल्या लक्झरी कारमधून सफर केली. त्यावेळचा त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात तो आपल्या गाडीच्या पाया पडताना दिसत आहे. कार्तिक गाडी चालवत होता तेव्हा त्याला माध्यमाच्या प्रतिनिधींनी घेराव घेतला. त्यांना पाहून कार्तिकने गाडी थांबवली. तो गाडीतून खाली उतरला आणि चक्क गाडीच्या पायाच पडला. अर्थात त्याने गाडीच्या बोनेटला हात लावला. मात्र, ते जणू गाडीच्या पाया पडत आहे असंच दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तो म्हणतो की, कार्तिकने स्वतःच्या कष्टाच्या कमाईने गाडी खरेदी केली म्हणून तो गाडीला नमस्कार करत आहे. कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही जण याला नाटकं म्हणत आहेत तर काही जण कार्तिकसाठी खूश आहेत.

कार्तिकने आपली लॅम्बॉर्गिनी URUS ही गाडी इटलीमधून खरेदी केली आहे. या गाडीची किंमत साडे चार करोड रुपये इतकी आहे. एवढंच नाही तर कार्तिकने ही आपली ड्रीम कार भारतात आणण्यासाठी ५० लाख रुपये ही वेगळी रक्कम मोजली आहे. तीन महिने वाट पाहिल्यानंतर शेवटी कार्तिककडे ही गाडी आलीच.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिकने २०१७ मध्ये एक बीएमडब्ल्यू गाडी खरेदी केली होती. २०१९ साली कार्तिकने आपल्या आईला एक गाडी भेट म्हणूनही दिली होती. कार्तिक नुकताच करोनातून बरा झाला आहे.

कार्तिक लवकरच ‘भूल भूलैय्या’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी दिसेल. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. याव्यतिरिक्त कार्तिक नेटफ्लिक्सच्या ‘धमाका’ या चित्रपटात काम करत आहे. यात तो एका पत्रकाराची भूमिका साकारत आहे. करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटातही कार्तिक पाहायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:48 pm

Web Title: kartik aryan is showing respect to his new car vsk 98
Next Stories
1 Video : म्हणून परिक्षकाने हिसकावलं ‘मिसेस श्रीलंका’ स्पर्धेच्या विजेतीचं मुकूट
2 ‘या’ व्हिडीओमुळे दिशा पटानी झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले…
3 शिल्पा शेट्टीच्या पतीचा ‘जोकर’ अवतार; म्हणाला, “मी वेगळा असल्याने ते….
Just Now!
X