News Flash

कार्तिकीच्या साखरपूड्याचा सैराट व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ

‘सा रे ग म प- लिटील चॅम्प्स’ या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी कार्तिकी गायकवाड सध्या चर्चेत आहे. या चर्चेचं कारण ठरलंय ते म्हणजे कार्तिकीचा साखरपुडा. आपल्या आवाजाने अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारी कार्तिकीचे आयुष्य आता एका नव्या वळणावर आहे. २६ जुलै रोजी कार्तिकीचा साखरपुडा झाला आहे. आता तिच्या साखरपुड्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

कार्तिकीने २६ जुलैला रोनित पिसेसोबत साखरपुडा केला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. आता कार्तिकीच्या आयुष्यातील खास क्षणांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिकी आणि रोनित अतिशय ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत.

कार्तिकीचा साखरपूडा एका मोठ्या रिसॉर्टवर पार पडला असल्याचे दिसत आहे. कार्तिकीने व्हिडीओमध्ये लाल रंगाचा लाँग गाऊन परिधान केला असून ती अतिशय सुंदर दिसत आहे. तसेच तिने साखरपुड्याला साडी नेसली आहे. तिचा साखरपुड्याचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

कार्तिकीचे वडिल कल्याणजी गायकवाड यांनी मित्रपरिवारात हे लग्न ठरवले आहे. रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून तो इंजिनिअर आहे. लग्नाची तारीख अद्याप काढण्यात आलेली नाही अशी माहिती कार्तिकीने दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:52 pm

Web Title: kartiki gaikwad and ronit pise engagement video viral avb 95
Next Stories
1 सुशांतच्या खात्यातून खरंच १५ कोटी काढले गेले होते का? CA म्हणाले…
2 सुशांत नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नाही- अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा
3 Birthday Special : कियाराच्या ‘या’ छोट्या बॅगची किंमत माहितीये का ?
Just Now!
X