‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून नावारुपाला आलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. आजवर अनेक गाण्यांना आवाज देणारी कार्तिकी कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. काही दिवसांपूर्वीच कार्तिकीने रोनित पिसेबरोबर लग्नगाठ बांधली असून रोनितसोबतचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्येच आता कार्तिकीने एक रोमँण्टिक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अलिकडेच कार्तिकी आणि रोनितने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावली होती. या कार्यक्रमात कार्तिकी आणि रोनित यांची धमाकेदार एण्ट्री झाली. या दोघांनीही ‘जिंदगी का सफर’ या गाण्यावर रोमँण्टिक डान्स केला.
View this post on Instagram
आणखी वाचा- सरप्राईज! …म्हणून सिद्धार्थने शहनाजला फेकलं पाण्यात
‘जिंदगी का सफर.. अब तेरे साथ में’ हे गाणं कार्तिकीने स्वत: गायलं असून तिच्या भावाने कौस्तुभ गायकवाडने तिला साथ दिली आहे. विशेष म्हणजे हे गाण कार्तिकीच्या लग्नासाठी खास तयार करण्यात आलं होतं. कार्तिकी आणि रोनित यांचा संपूर्ण लग्नसोहळा या गाण्यात दाखवण्यात आला होता. या गाण्याचा व्हिडीओ तिने तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2021 12:03 pm