News Flash

‘कसौटी जिंदगी के’ अभिनेता साहिल आनंदने ‘या’ कारणासाठी मागितली फॅन्सची माफी

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने म्हणाला................

photo-Sahil Anand video went viral

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता साहिल आनंद सध्या बराच चर्चेत आहे. साहिल आनंद सोशल मीडियावर तसा चांगलाच सक्रिय आहे. मात्र काही दिवसांपूर्वी साहिल आनंदने सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. १९ जुलै रोजी साहिलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मोठी पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये तो मानसिक आरोग्याबद्दल बोलत होता. याच कारणामुळे तो काही काळ सोशल मीडियापासून लांब राहणार असल्याचे त्याने या पोस्टद्वारे सांगितले. या निर्णयामुळे त्याच्या बऱ्याच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

साहिलने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. मात्र आता साहिलने ही पोस्ट काढून टाकली आहे आणि त्या जागी माफी मागतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओत पोस्ट करत त्याने लिहीले की “मी तुम्हाला असं मधेच सोडल्या बद्दल तुमची (चाहत्यांची) माफी मागतो.” असं त्याने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले.  साहिलने हा व्हिडीओ त्याच्या गाडीत बसून शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये चाहत्यांशी बोलताना तो म्हणाला की “सॉरी मी तुम्हाला त्रास दिला, मला वाटले नव्हते की माझा तो मेसेज इतका परिणामकारक ठरेल.”

Sahil-anand-post photo-Sahil anand instagram

यापुढे बोलताना साहिल म्हणाला की “माझ्या त्या पोस्टमुळे कुणी दुखावलं असेल तर असेल मला माफ करा, मला तुम्हाला दुखवायचे नव्हते. मला फक्त सोशल मीडिया सगळ्यापासुन लांब राहायचे आहे. हे स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे कारण तुम्ही माझ्या आयुष्याचा भाग आहात.” साहिलने त्या व्हिडीओत सपष्ट केलं की तो एक चित्रपटसाठी काम करत आहे. गंभीर विषयावर असून अजुनही यातल्या पात्रामधून बाहेर पडू शकला नाही. याचा गोष्टीचा त्याला त्रास होत असल्याने तो चंदीगडला गेलो. यातून बाहेर पडण्यासाठी तो मानसपचोरतज्ञांना भेटला आहे. काही काळ स्वत:ला वेळ देण्याचा सल्ला मानसपचोरतज्ञांनी दिला असल्याचे त्याने या व्हिडीओत सांगितले

 

View this post on Instagram

 

A post shared by Sahil Anand (@sahilanandofficial)


साहिल आनंदने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटात काम केले आहे. ‘है अपना दिल तो आवारा’, ‘बिग बॉस’ आणि ‘कसोटी जिंदगी की’ सारख्या अनेक मालिकांमध्ये देखील त्याने काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 11:16 am

Web Title: kasauti zindagi kay actor sahil anand post video and apologies to his fans for quitting social media went viral aad 97
Next Stories
1 “माझा मोबाईल नंबर लीक केला आणि…”; पूनम पांडेचे राज कुंद्रावर गंभीर आरोप
2 गर्भवती असल्याच्या चर्चांवर सोनम कपूरने सोडलं मौन
3 “आमिर खानशी लग्न कधी करताय?”; प्रश्न विचारत नेटकऱ्याने फातिमा सना शेखला केलं ट्रोल
Just Now!
X