News Flash

Video : अशी आहे ‘कसौटी जिंदगी..’च्या कोमोलिकाची पहिली झलक

एकता कपूरने इन्स्टाच्या माध्यमातून कोमोलिकाची पहिली झलक दाखविली आहे.

एकता कपूरची बहुप्रतिक्षित ठरलेली ‘कसौटी जिंदगी की- २’ ही मालिका काही दिवसापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिका प्रसारित झाल्यापासून यातील जवळपास सगळ्याच पात्रांचा खुलासा झाला. परंतु कोमोलिकाची भूमिका कोण निभावणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं. आता कोमोलिकाच्या भूमिकेवरीलही पडदा दूर करण्यात आला असून एकता कपूरने इन्स्टाच्या माध्यमातून कोमोलिकाची पहिली झलक प्रेक्षकांना दाखविली आहे.

‘कसौटी जिंदगी…’च्या पहिल्या सीजनमध्ये कोमोलिकाचं पात्र प्रचंड गाजलं होतं. यात उर्वशी ढोलकियाने कोलोमिकाची भूमिका वठविली होती. त्यामुळे कसौटी जिंदगीच्या सीक्वलमध्ये कोण झळकणार याविषयी प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या सीक्वलमध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिना खान कोमोलिकाची भूमिका वठविणार आहे.

या कार्यक्रमातील हिनाचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला असून यात हिनाने काळ्या आणि चंदेरी रंगाची लेहंगा -चोली घातली आहे. यात ती प्रचंड बिंधास्त लूकमध्ये असून तिने केलेली एण्ट्री चाहत्यांच्या पसंतीत उतरल्याचं दिसून येत आहे.

एकताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन हिना खानचं कोमोलिकाच्या रुपात स्वागत आहे असं म्हटलं आहे. या मालिकेपूर्वी हिना खानने रे रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत एका आदर्श सुनेची भूमिका वठविली होती. त्यानंतर ‘खतरों के खिलाडी ८’ आणि ‘बिग बॉस ११’ मध्येही झळकली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 10:56 am

Web Title: kasautii zindagii kay 2 hina khan first look as komolika
Next Stories
1 Bigg Boss 12 : ‘बिग बॉस’च्या घरातून नेहा पेंडसे बाहेर
2 #MeToo : वडीलांवर झालेल्या आरोपाविषयी मल्लिका दुआ म्हणते…
3 #MeToo : बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज ११ महिलांनी उचललं महत्वाचं पाऊल
Just Now!
X