News Flash

बिग बॉगमधली सर्वाधिक चर्चेत असलेली ही अभिनेत्री साकारणार ‘कोमोलिका’?

छोट्या पडद्यावरची 'आदर्श सून' खलनायिका साकारायला होकार देते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उर्वशी ढोलकिया कोमोलिकाच्या भूमिकेत

छोट्या पडद्यावरची गाजलेली मालिका ‘कसौटी जिंदगी की’ ही बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा येत आहे. या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणार कोण याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. कोमोलिकाच्या कट कारस्थानाबरोबरच तिची स्टाईल, मालिकेत तिच्या एण्ट्रीवर येणारं विशिष्ट म्युझिक हेही त्यावेळी खूपच गाजलं. आजही या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी उर्वशी ढोलकिया याच नावानं ओळखली जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून एकता कपूर या भूमिकेसाठी ‘कोमोलिका’चा शोध घेत आहे. आता मात्र एकताला मनाजोगी ‘कोमोलिका’ मिळाली असून बिग बॉसमधली सर्वात प्रसिद्ध व्यक्ती आता ही खलनायिका रंगवायला सज्ज झाली आहे.

‘बिग बॉस’च्या ११ व्या सिझनची उपविजेती हिना खान कोमोलिका साकारणार असल्याचं जवळजवळ निश्चित झाल्याचं समजत आहे. ‘कोमोलिकाच्या व्यक्तिरेखेसाठी मी एकाच व्यक्तीचा विचार केला आहे आणि माझी ही निवड पहिली आणि शेवटची असणार आहे. या मालिकेत सगळेच चेहरे नवे असले तरी कोमोलिकाच्या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेणं मला कठीण जात आहे.’ असंही एकतानं ट्विट केलं होतं. आता कोमोलिका या छोट्या पडद्यावरच्या प्रसिद्ध खलनायिकेच्या जागी हिना खानची वर्णी लागली आहे.

हिना खान

एकताच्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून हिना घराघरात पोहोचली. छोट्या पडद्यावरची ‘आदर्श सून’ अशी हिनाची प्रतिमा होती. मात्र बिस बॉसमधून तिनं या प्रतिमेला छेद दिला आणि हळूहळू हिनाची प्रतिमा बदलू लागली. आता हिनाचाच विचार एकतानं या भूमिकेसाठी केल्याचं समजत आहे. एकतानं अजूनही यासंबधी अधिकृत घोषण केली नाही. त्यामुळे हिना ही भूमिका साकारणार की नाही याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 2:22 pm

Web Title: kasautii zindagii kay 2 makers have approached actress hina khan to play komolika
Next Stories
1 Gul Makai Teaser : ‘मेरा नाम मलाला क्यूँ रखा?’
2 ‘हेलिकॉप्टर इला’ मधूम कमबॅक करण्यास काजोल सज्ज
3 दिग्दर्शकानेच इशान-जान्हवीला दिला होता सैराट न पाहण्याचा सल्ला
Just Now!
X