25 November 2020

News Flash

‘कसौटी जिंदगी की 2’ घेणार प्रेक्षकांचा निरोप?

चॅनेलने घेतला मालिका बंद करण्याचा निर्णय?

काही वर्षांपूर्वी आलेली ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: गाजली होती. या मालिकेतील प्रेरणा अनुरागच्या जोडीबरोबरच कोमोलिका ही खलनायिकाही लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. त्यामुळेच या मालिकेचा दुसरा भाग ‘कसौटी जिंदगी की 2’देखील काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु, आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘स्पॉटबॉय’च्या वृत्तानुसार, या मालिकेला टीआरपी मिळत नसल्यामुळे चॅनेलने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मालिकेतील अनेक कलाकारांनी काढता पाय घेतला आहे. तसंच मुख्य भूमिकेत झळकलेला अभिनेता पार्थनेदेखील मालिकेला रामराम केला आहे. त्यामुळे या मालिकेचं टीआरपी झपाट्याने खाली येताना पाहायला मिळत आहे. म्हणूनच ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, ही मालिका नोव्हेंबर २०२० मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेईल असं म्हटलं जात आहे.

दरम्यान,’कसौटी जिंदगी की 2′ मध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले होते. मालिकेच्या कथानकामध्येदेखील अनेक ट्विस्ट घेण्यात आले होते. मात्र ‘कसौटी जिंदगी की’ला प्रतिसाद दिला होता. तो ‘कसौटी जिंदगी की 2’ ला मिळत नसल्याचं मालिकेच्या टीमच्या आणि चॅनेलच्या लक्षात आलं आहे. ‘कसौटी जिंदगी की’मध्ये श्वेता तिवारी, सिजेन खान, उर्वशी ढोलकिया आणि रोनित रॉय हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 2:09 pm

Web Title: kasautii zindagii kay 2 may go offair in november ssj 93
Next Stories
1 करोनाची लागण कशी झाली, २१ दिवसांत त्यावर मात कशी केली?; जेनेलियाने सांगितला अनुभव
2 “अभिनय पाहून अंगावर शहारे आले”; सोनम कपूरने लंडनच्या थिएटरमध्ये पाहिला चित्रपट
3 ‘महेश भट्ट यांची सीबीआय चौकशी का नाही?’; सुचित्रा कृष्णमूर्तीचा सवाल
Just Now!
X