News Flash

‘मी सध्या सिंगल आहे…’, पार्थ समथानचा खुलासा

एका मुलाखतीत पार्थने रिलेशनशिपवर खुलासा केला आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘कसौटी जिंदगी की २’. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेत अनुराग बासूची भूमिका साकारणारा अभिनेता पार्थ समथान सर्वात जास्त चर्चेत होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पार्थने त्याच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले आहे.

एका मुलाखतीत पार्थ समथान ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या त्याच्या आगामी वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी आला होता. यावेळी पार्थने त्याच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा केला. “मी सिंगल आहे आणि आनंदी आहे. पण आता मला असं वाटतं की आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती असायला हवी कारण सध्याची परिस्थिती खूप कठिण आहे,” असं पार्थ म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan)

“कोणासोबत रिलेशनशिपमध्ये यायला आवडेल का?” असा प्रश्न पार्थला विचारण्यात आला. “हो नक्कीच,” असे उत्तर देत रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी तो तयार असल्याचं पार्थने सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan)

पुढे करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर पार्थ म्हणाला, “मला आशा आहे की लवकरचं सगळं पूर्वपदावर येईल. त्यानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन जीवनात येऊ आणि खूप मोठ मोठी कामं करु.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Parth Samthaan (@the_parthsamthaan)

पार्थने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने ‘यह है आशिकी’, प्यार तूने क्या किया, सावधान इंडिया, कैसी है यारियां सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की २’ या मालिकेती अनुरागच्या भूमिकेने त्याला खरी लोकप्रियता मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 5:39 pm

Web Title: kasautii zindagii kay 2 s parth samthaan is bilkul single and is ready to mingle given the times we live in dcp 98
Next Stories
1 “पंतप्रधानांकडे लक्झरी घर असायलाच हवं”; केआरकेचा मोदींना खोचक टोला
2 ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’च्या टायटल ट्रॅकचे अनावरण!
3 अभिनेता, दिग्दर्शक सुखजिंदर शेरा यांचे निधन
Just Now!
X