News Flash

अभिनेत्रीला करोनाची लक्षणं पण चाचणीच कोणी करेना; सरकारकडे केली विनंती

जर एखाद्याला करोना चाचणी करण्यातच इतक्या अडचणी येत असतील तर सरकार पुढे लोकांना कशी मदत करणार?, असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.

अभिनेत्री चार्वी सराफ

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्री चार्वी सराफला आठवड्याभरापासून करोनाची लक्षणे जाणवत आहेत, मात्र तरीही तिची चाचणी करण्यास कोणी तयार नसल्याची तक्रार तिने केली आहे. चार्वी दिल्लीत राहते. तिने दिल्ली सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.

‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, चार्वीला ताप, अंगदुखी, घसादुखी, डोकेदुखी आणि श्वसनाचा त्रास जाणवत आहे. सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी तिला चाचणी करण्यास नकार दिल्याचं तिने सांगितलं. “मला लक्षणं दिसू लागताच सर्वांत आधी करोनाची चाचणी करण्याचा विचार केला. लगेचच मी काही डॉक्टरांना फोन केला. त्यांच्याकडे कोविड १९ चे टेस्ट किट्स नसल्याचं मला सांगण्यात आलं. त्यानंतर काही खासगी व सरकारी रुग्णालयांना फोन केला. आमच्याकडे चाचणीची सुविधा नसल्याचं कारण देत त्यांनीसुद्धा थेट नकार दिला. माझी दिल्ली सरकारला विनंती आहे की मी सध्या घरातून निघून चाचणीसाठी कोणत्या रुग्णालयात जाऊ शकत नाही. कृपया माझ्या घरी कोणीतरी यावं आणि करोनाची चाचणी करावी”, असं ती म्हणाली.

जर एखाद्याला करोना चाचणी करण्यातच इतक्या अडचणी येत असतील तर दिल्ली सरकार पुढे लोकांना कशी मदत करणार हेच कळत नाही, असं म्हणत तिने सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

चार्वीने ‘कसौटी जिंदकी की’ या मालिकेत प्रेरणाच्या बहिणीची भूमिका साकारली होती. २००३ मध्ये लोकप्रिय ठरलेल्या या मालिकेचा हा नवीन सिझन होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 11:51 am

Web Title: kasautii zindagii kay charvi saraf says she has covid 19 symptoms is unable to get a test ssv 92
Next Stories
1 ‘लॉकडाउन कमी होतोय पण…’; लता मंगेशकरांचं जनतेला आवाहन
2 चिरंजीवीच्या निधनानंतर त्याच्या भावाची पोस्ट वाचून तुम्हीही भावूक व्हाल
3 अभिनेत्रीच्या कुटुंबातील ४०-४५ लोकांना करोनाचा धोका; सरकारकडे मदतीची विनवणी
Just Now!
X