26 September 2020

News Flash

Kasautii Zindagii Kay remake : कोमोलिकाच्या भूमिकेसाठी एकताची ‘कसौटी’

मालिकेतील सर्वच कलाकार नवीन असले तरी कोमोलिकाची भूमिका साकारणाऱ्या उर्वशीच्या जागी कोणाला घ्यायचं हा  प्रश्न अजूनही एकतासमोर आहे.

मालिकेतील सर्वच पात्र नवीन असले तरी कोमोलिकाची भूमिका साकारणाऱ्या उर्वशीच्या जागी कोणाला घ्यायचं हा प्रश्न मात्र अजूनही एकतासमोर आहे.

काही वर्षांपूर्वी आलेली ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका छोट्या पडद्यावर अक्षरश: गाजली होती. या मालिकेतील प्रेरणा अनुरागच्या जोडीबरोबरच कोमोलिका ही खलनायिकाही लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. कोमोलिकाच्या कट कारस्थानाबरोबरच तिची स्टाईल, मालिकेत तिच्या एण्ट्रीवर येणारं विशिष्ट म्युझिक हेही त्यावेळी खूपच गाजलं. आजही या मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी उर्वशी ढोलकिया याच नावानं ओळखली जाते. तर लवकरच या मालिकेचा रिमेक येणार असून यासाठी नवीन कलाकारांचा शोध एकता घेत आहेत. मालिकेतील सर्वच कलाकार नवीन असले तरी कोमोलिकाची भूमिका साकारणाऱ्या उर्वशीच्या जागी कोणाला घ्यायचं हा  प्रश्न अजूनही एकतासमोर आहे.

कोमोलिकाच्या व्यक्तिरेखेसाठी मी एकाच व्यक्तीचा विचार केला आहे आणि माझी ही निवड पहिली आणि शेवटची असणार आहे. या मालिकेत सगळेच चेहरे नवे असले तरी कोमोलिकाच्या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेणं मला कठीण जात आहे. असंही एकतानं ट्विट केलंय. मात्र काही सुत्रांच्या माहितीनुसार उर्वशी ढोलकियाच कोमोलिकाची भूमिका साकरू शकते. येत्या काही दिवसांत एकता स्वत: नावांची घोषणा करणार आहे.

तर टेलिव्हिजन विश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री एरिका फर्नांडिस ही मुख्य भूमिकेत असणार आहे. एरिका प्रेरणाची भूमिका साकारणार आहे. तसेच एकता ‘अनुराग’चा शोध घेत आहे. एकताला या मालिकेसाठी योग्य अभिनेता अजूनही मिळाला नाही, त्यामुळे ‘अनुराग’साठी योग्य चेहरा मिळाला की मालिकेच्या प्रमोशनला सुरूवात होईल असं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 4:15 pm

Web Title: kasautii zindagii kay remake who will play komolika
Next Stories
1 #couplegoals : लग्नानंतर मिलिंद-अंकिताचं पहिलं फोटोशूट
2 Video : असा साकारला ‘मुन्ना भाई’चा लूक
3 साराच्या करिअरमध्ये करिना करतेय अशी मदत
Just Now!
X