कधी काळी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या नव्या मालिकेसाठी एकता कपूरची संपूर्ण टीम सज्ज झाली असून या सीक्वेलच्या माध्यमातून नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ‘कसौटी जिंदगी..’ मध्ये अभिनेता शाहरुख खानही झळकणार असून काही मिनिटासाठी शाहरुखने सर्वाधिक मानधन घेतल्याचं समोर आलं आहे.
‘टाईम्स नाऊ’नुसार, या मालिकेमध्ये एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. तर हिना खान खलनायिका असलेल्या कोमोलिकाची भूमिका रंगवणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच शाहरुखही या मालिकेत काही काळासाठी झळकणार आहे. मात्र या लहानशा भूमिकेसाठी शाहरुखने एका मिनीटासाठी तब्बल १.११ लाख रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
शाहरुखने या मालिकेत झळकावं अशी एकताची इच्छा होती. यासाठी तिने काही दिवसापूर्वी शाहरुखची भेटही घेतली होती. त्यामुळे शाहरुख या मालिकेमध्ये झळकण्यास तयार झाला आहे. मात्र त्याने मालिकेच्या प्रमोशनसाठी तब्बल ८ कोटी रुपये घेतल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रमोशनमध्ये तो त्याच्या ‘टेड टॉक’ या शोचंही प्रमोशन करणार आहे.
दरम्यान, या प्रमोशनचं चित्रीकरण करण्यासाठी २ ते ३ तास लागले असून शाहरुखने एका मिनीटासाठी १.११ लाख रुपये आकारले आहेत. त्यामुळे या मालिकेसाठी सर्वाधिक मानधन शाहरुखने स्वीकारल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच यापूर्वी अभिनेत्री हिना खान हिने कोमोलिकाच्या भूमिकेसाठी तब्बल २.२५ लाख रुपये मानधन स्वीकारल्याचं सांगण्यात आलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 28, 2018 12:30 pm