News Flash

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता प्राचीन चौहानला अटक, तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप

पीडितेने मालाड पूर्व पोलीस ठाण्यात अभिनेता प्राचीन चौहान विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

(Photo-Instagram@pracheenchauhan)

नुकतीच टेलिव्हीजन अभिनेता पर्ल वी पुरीला पोलिसांनी अटक केली होती. एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा पर्लवर आरोप. अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच आता टेलिव्हिजन जगातातून आणखी एक धक्कादाखक बातमी समोर आलीय. एकता कपूरच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केलेला अभिनेता प्राचीन चौहानला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपात प्राचीनला मालाड पोलिसांनी अटक केली आहे.

पीडितेने मालाड पूर्व पोलीस ठाण्यात अभिनेता प्राचीन चौहान विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कलम ३५४, ३४२,३२३,५०२(२) अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी पोलिस पुढील चौकशी करत असून प्राचीनच्या अटकेमुळे पुन्हा एकदा टीव्ही जगतात मोठा धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pracheen Chauhan (@pracheenchauhan)

हे देखील वाचा: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला ईडीकडून दणका, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी समन्स

टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्राचीनचे अनेक मित्र आहेत मात्र अद्याप या प्रकरणी कुणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही. प्राचीनने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर तो उन्होंने ‘कुछ झुकी पालके’, ‘सिंदूर तेरे नाम का सात फेरे’ अशा काही मालिकांमधून झळकला.

दरम्यान प्राचीन सध्या यूट्यूबवरील प्रसिद्ध वेब शो ‘शिट्टी आयडियाज ट्रेंडिंग (SIT)’ मध्ये छवी मित्तल आणि पूजा गौरकेसोबतच काम करतोय. त्याची अभिमन्यू ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 9:00 am

Web Title: kasuti jindgi ki fame tv actor pracheen chauhan arrested by mumbai police in molestation allegations kpw 89
Next Stories
1 अनुष्का शर्माने पती विराट कोहलीला दिली टक्कर; विरुष्काचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
2 बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला ईडीकडून दणका, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी समन्स
3 ‘सोन्याची पावलं’ कलर्स मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला नवी मालिका
Just Now!
X