‘अवतार’ हा सिनेइतिहासातील आजवरच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. उत्कृष्ट अ‍ॅनिमेशन, दर्जेदार अभिनय, उत्तम पटकथा आणि जेम्स कॅमरुन यांचं अफलातून दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. २००९ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जवळपास २ हजार ७७८ अब्ज अब्ज अमेरिकी डॉलर्सची कमाई केली होती. यावरुनच या चित्रपटानं मिळवलेलं यश आपल्या लक्षात येतं. आता या यशस्वी चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

अवश्य पाहा – ‘बिहार प्रचारात माझ्यावर बलात्कार झाला असता’; अमिषा पटेलने प्रकाश चंद्रांवर केला आरोप

न्यूझिलंडमध्ये ‘अवतार २’च्या चित्रीकरणाची सुरुवात झाली आहे. नुकतेच जेम्स कॅमरुन यांनी अभिनेत्री केंट विन्सलेटचा एक फोटो पोस्ट करुन याबाबत प्रेक्षकांना माहिती दिली. लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटाचा बहुतांशी भाग खोल पाण्यात शूट केला जाणार आहे. त्यासाठी कलाकारांना तब्बल सात मिनिट श्वास रोखून अभिनय करावा लागू शकतो. यासाठी कलाकारांनी देखील खास तयारी केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे चित्रपटातील एक सीन शूट करण्यासाठी केट विन्सलेट पाण्यात तब्बल सात मिनिटं १४ सेकंद श्वास रोखून उभी राहिली होती. या सीनचा फोटो सध्या सोशल मीडियारवर जोरदार व्हायरल होत आहे.

अवश्य पाहा – ‘या अभिनेत्रीला माझ्या मांडीवर बसवायचो; सलमानच्या प्रश्नावर अभिनेत्याचं वादग्रस्त विधान

‘अवतार’ चित्रपटात २१५४ चा काळ दाखवण्यात आला आहे. मानवाने पृथ्वीवरील संपूर्ण उर्जा संपत्तीचा उपभोग घेतला आहे. आता मानवाला नवीन ऊर्जा स्रोतांची गरज आहे. संशोधन करून मानव ‘पँडोरा’ नामक ग्रहावर पोहोचतो. तेथील अफाट उर्जा स्त्रोत पाहून त्या ग्रहावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान मानव व पँडोरा ग्रहावरील सजीव यांच्यात झालेले युद्ध अवतार मध्ये दाखवण्यात आले. या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या भागात जेम्स कॅमरुन काय दाखवणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.