News Flash

रणबीर आलियालाही फसवणार, कतरिनाला वाटतेय भीती

या दोघांचं नातं फार काळ टिकणार नाही, रणबीर आलीयाला फसवणार आणि आलियाला मात्र याचा मनस्ताप होईल अशी भीती कतरिनाला वाटत आहे.

आलिया भट्ट, रणबीर कपूर

रणबीर आणि आलिया हे बॉलिवूडमधलं ‘क्यूट कपल’ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. पण याच कारणानं रणबीरची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफ कमालीची अस्वस्थ झाली आहे. या दोघांचं नातं फार काळ टिकणार नाही, रणबीर आलीयाला फसवणार आणि आलियाला मात्र याचा मनस्ताप होईल अशी भीती कतरिनाला वाटत आहे.

डेक्कन क्रोनिकलनं खात्रीलायक सुत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे की रणबीर आलियाच्या नात्यामुळे कतरिना कमालीची दुखावली आहे. जशाप्रकारे रणबीरनं तिचा हृदयभंग केला तसंच तो आलियासोबत वागणार आहे याची भीती कतरिनाला वाटत आहे. कतरिना बऱ्याच वर्षांपासून इण्डस्ट्रीत काम करत आहे. असं असलं तरी या इण्डस्ट्रीत तिच्या मैत्रीणी मात्र कोणीही नाही. पण ती आलिया भट्टच्या मात्र खूपच जवळ होती. या दोघींमधलं मैत्रीचं नातं अगदी घट्ट होतं. इतकंच नाही तर कतरिना मोठ्या बहिणीप्रमाणे आलियाची नेहमीच काळजी घ्यायची. पण आलियानं मात्र आपल्या नात्याबद्दल कधीही जवळच्या मैत्रिणीला सांगितलं नाही त्यामुळे कतरिना खुपच दुखावली आहे. पण काहीही असलं तरी आलियाची तिला जास्तच काळजी वाटत असल्याचं कतरिनाच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे.

कतरिनामुळेच रणबीरच्या करिअरचे वाजले तीनतेरा?

काही सुत्रांच्या माहितीनुसार आलियानं रणबीरसोबतच्या आपल्या नात्याबद्दल कतरिनाला काहीही सांगितलं नव्हतं. इतकंच नाही तर हे प्रकरण मीडियात चर्चेत आल्यानंतर कतरिनाला आलिया रणबीरच्या नात्याबद्दल समजल्याचं म्हटलं जातं आहे. रणबीरसोबत इतकी वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यानंतर तो व्यक्ती म्हणून कसा आहे हे कतरिना पुरेपुर जाणून आहे. याआधीही रणबीरनं अनेक मुलींचा हृदयभंग केलाय. यात दीपिकाही होतीच. त्यामुळे आलियासोबतही तो तसाच वागेल आणि तिला मात्र याचा त्रास होईल या चिंतेनं कतरिनाला ग्रासलं आहे. पण कतरिनानं या प्रकरणात नाक न खुपसण्याचं किंवा आलियाला कोणताही सल्ला न देण्याचं ठरवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 12:42 pm

Web Title: katrina is hurt and she knows ranbir kapoor will ditch alia bhatt too
Next Stories
1 प्रियांका- निक जोनास लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये?
2 #WorldMusicDay : गाना आये या ना आये गाना चाहिए..
3 ठरलं हो ठरलं! रणवीर दीपिकाचं लग्न ‘या’ तारखेला
Just Now!
X