News Flash

जॉन अब्राहममुळे कतरिना सलमान खानसमोर रुडू लागली; दबंग खान म्हणाला…

एका मुलाखतीत सलमान खानने त्यावेळी कतरिनाची अवस्था कशी झाली होती यावर खुलासा केला होता.

Photo-Indian Express Archive)

अभिनेत्री कतरिना कैफने आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली असली तरी एकेकाळी कतरिनाला बॉलिवूडमध्ये काम मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. २००३ साली तर जॉन अब्राहमने एका सिनेमातून कतरिनाला काढून टाकलं होतं. जॉनने त्याच्या ‘साया’ या सिनेमातून कतरिनाला बाहेरचा रस्ता दाखवला आणि अभिनेत्री तारा शर्माची निवड केली.

या घटनेनंतर कतरिनाला प्रचंड वाईट वाटलं होतं. एका मुलाखतीत सलमान खानने त्यावेळी कतरिनाची अवस्था कशी झाली होती यावर खुलासा केला होता. तो म्हणाला, ” काही वर्षांपूर्वी जॉनने कतरिनाला त्याच्या सिनेमातून काढून टाकलं होतं. मला आठवतंय कतरिनाला काढून तारा शर्माला घेण्यात आलं होतं. तेव्हा कतरिना रडतं होती की माझं पूर्ण करिअर संपलं. तीन दिवस मला ते सहन करावं लागलं होतं. मला वाटलं की पुढे जाऊन ती मोठी कलाकार होणार आहे मग कशाला रडते. मी तिला म्हणालो देखील आज तू रडतेयस मात्र नंतर तूला ही गोष्ट आठवून तुला हसू येईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

हे देखील वाचा: अफ्रिकेतील ‘सीशेल’ आयलँडवर सोनाली कुलकर्णीचं मिनीमून

त्यानंतर २००९ सालामध्ये कतरिना आणि जॉन अब्राहम ‘न्यूयॉर्क’ सिनेमात एकत्र झळकले होते. या सिनेमामध्ये जॉन असल्याने कतरिना नाराज होती. यावर सलमान मुलाखतीत म्हणाला,” कतरिना माझ्याकडे आली होती आणि म्हणाली या सिनेमात जॉन आहे. तेव्ही मी म्हणालो तू फक्त सिनेमाची कथा आणि डायरेक्टरवर लक्ष दे.. सह कलाकार तर कुणीही असू शकतो. कतरिनाच्या मनात जॉनने तिला सिनेमातून काढल्याची खंत होती. मात्र कतरिनाला मी समजावलं आज तू अशा जागी आहेस की तू जॉनला काढू शकतेस. मात्र ते योग्य नाही.” असं म्हणत सलमानने कतरिनाची त्यावेळी समजूत घातल्याचं तो म्हणाला.

हे देखील वाचा: लेकीने शेअर केलेला व्हीडीओ पाहून नीना गुप्ता म्हणाल्या “हे भगवान”!

यानंतर कतरिना आणि जॉन ‘न्यूयॉर्क’ सिनेमात एकत्र झळकले. शिवाय हा सिनेमा चांगलाच हिट ठरला होता. या सिनेमातील जॉन आणि कतरिनाच्या अभिनयाचं कौतुक झालं होत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2021 9:20 pm

Web Title: katrina kaif cried because of joh abraham in front of salman khan john removed her from saya film kpw 89
Next Stories
1 “लस घेतली का?”; चाहत्याच्या प्रश्नावर लारा दत्ताचं हटके उत्तर म्हणाली…
2 कैलाश खेर यांनी गायलं ‘गाथा नवनाथांची’ मालिकेचं शीर्षगीत!
3 मिल्खा सिंग यांचा दिलदारपणा! ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाच्या मानधनापोटी घेतला होता फक्त एक रुपया
Just Now!
X