News Flash

‘…बऱ्याच काळानंतर’; कतरिनाने शेअर केला खास व्हिडीओ

कतरिनाच्या 'या' व्हिडीओला २४ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे तर कधी तिच्या डान्स व्हिडीओमुळे. आपल्या अनोख्या अंदाजात चाहत्यांची मनं जिंकण्याचा ती अनेकदा प्रयत्न करत असते. सध्या सोशल मीडियावर कतरिनाचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर कतरिनाने तिचा डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.

कतरिनाने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओ २४ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. कतरिनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती डान्सची प्रॅक्टिस करताना दिसत आहे. मात्र, अचानक ही प्रॅक्टिस सोडून ती मस्तीच्या मूडमध्ये डान्स करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)


‘..आणि बऱ्याच काळानंतर, आम्ही डान्स करतोय’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या व्हिडीओवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. मात्र, या व्हिडीओतील गाणं म्यूट करण्यात आलं आहे. त्यामुळे कदाचित कतरिना तिच्या आगामी चित्रपटासाठी ही डान्स प्रॅक्टिस करत असल्याचं म्हटलं जात आहे.

आणखी वाचा- ‘…म्हणून ‘त्या’ भूमिकांकडे आकर्षित होतो’; सैफचा खुलासा

दरम्यान, आपल्या मस्तीखोर अंदाजासाठी कायम चर्चेत असणारी कतरिना लवकरच ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार स्क्रीन शेअर करणार आहे. तर, ‘सूर्यवंशी’ व्यतिरिक्त ती ‘फोन भूत’ या आगामी चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटात इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीदेखील झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 8:39 am

Web Title: katrina kaif dance after a long time in rehearsal room video hits on internet ssj 93
Next Stories
1 टेलिव्हिजनवरील एका आईची इमेज ही बदलली पाहिजे – प्रिया मराठे
2 अमिताभ बच्चन यांनी केली रिटायरमेंटची घोषणा? म्हणाले, “मी सर्वांची माफी मागतो पण…”
3 चित्रपटासाठी गर्दी करणं चाहत्यांना पडलं भारी; संतापलेल्या प्रशासनानं केली पोलीस तक्रार
Just Now!
X