News Flash

कतरिनाचा अॅक्शन अवतार

सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यानचेही तिने काही फोटो शेअर केले आहेत

कतरिना कैफ जिथे ‘जग्गा जासूस’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे तर दुसरीकडे ती ‘टायगर जिंदा है’ सिनेमाचे चित्रीकरणही करत आहे. अली जाफर दिग्दर्शित या सिनेमाचा निर्माता आदित्य चोप्रा आहे. सलमान खानसोबत कतरिनाच्या या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता पाहायला मिळतेय.

Father’s Day 2017: मी सईला पहाटे ३ वाजताही उठवतो- सागर कारंडे

या सिनेमाची अजून एक खास बात म्हणजे ‘द डार्क नाइट’ या सिनेमाचा अॅक्शन दिग्दर्शक टॉम स्टुथर्सने कतरिनाला या सिनेमासाठी खास अॅक्शन सीन शिकवले आहेत. टॉमशिवाय बस्टर रीव्स हाही ‘टायगर जिंदा है’ या सिनेमात कतरिनाला अॅक्शन सीन शिकवताना दिसणार आहे. कतरिना सौशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यानचेही तिने काही फोटो शेअर केले आहेत. या सिनेमात कतरिना बंदुक चालवण्यात जेवढी तरबेज असते तेवढीच ती तलवार बाजीतही तरबेज दाखवण्यात आली आहे. असं म्हटलं जातं की, ‘टायगर जिंदा है’ सिनेमासाठी कतरिनाला जेवढी अॅक्शन सीनसाठी मेहनत घेत आहे तेवढीच ती वर्कआऊटही करतेय.

katrina-kaif

२०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ सिनेमाचा हा आगामी सिनेमा सिक्वल आहे. या सिनेमामधून सलमान आणि कतरिना चार वर्षांनंतर एकत्र येणार आहेत. यात परेश रावल यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा सिनेमा अबू धाबी आणि ऑस्ट्रिया या दोन देशात चित्रीत झाल्यानंतर आता मुंबईमधील चित्रीकरणही संपले आहे. या वर्षाअखेरीस म्हणजे २ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

युद्ध करण्यापेक्षा समोरा समोर बसून बोला, सलमानचा भारत- पाकला सल्ला

कतरिना, रणबीर कपूरसोबत मिळून ‘जग्गा जासूस’चे प्रमोशन करणार नसल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. मात्र आता तिने सर्व गोष्टी बाजूला सारत सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. प्रमोशनसाठी दोघेही एकत्र मुलाखती आणि अनेक शहरांची भ्रमंतीसुद्धा करणार आहेत. त्यामुळे रणबीर आणि कतरिनाच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी ठरणार आहे. अनुराग बासू दिग्दर्शित हा सिनेमा येत्या १४ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 3:08 pm

Web Title: katrina kaif doing action for salman khan movie tiger zinda hai pics out
Next Stories
1 ‘दंगल’ला टक्कर देण्यास ‘बाहुबली’ सज्ज
2 हृतिक रोशनचीच मुलं असं काही करू शकतात
3 मिलिंदच्या आयुष्यात परतलं प्रेम?
Just Now!
X