04 June 2020

News Flash

कतरिनाच्या बोटातील ‘ती’ अंगठी साखरपुड्याची तर नव्हे?

कतरिना कैफ आणि रणबीर कपूरने लंडनमध्ये गुप्तपणे साखरपुडा केल्याची बातमी काही दिवसांपूर्वी माध्यमातून झळकली.

| January 12, 2015 12:07 pm

kat-450
कतरिना कैफ आणि रणबीर कपूरने लंडनमध्ये गुप्तपणे साखरपुडा केल्याची बातमी काही दिवसांपूर्वी माध्यमातून झळकली. अलीकडेच मुंबईत पार पडलेल्या ‘उमंग’ या कार्यक्रमात रणबीर कपूरसह उपस्थित असलेल्या कतरिना कैफच्या बोटातील ती अंगठी सर्वांच लक्ष वेधून घेत होती. कतरिनाच्या बोटातील ती अंगठी साखरपुड्याची तर नव्हे अशी शंका उपस्थित झाली आहे. मंचावर आलेली कतरीना करण जोहरबरोबर ‘चिकनी चमेली…’ गाण्यावर नृत्याच्या काही स्टेप्स करीत असताना त्या अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनारकली पोषाखातील कतरिना कमालीची सुंदर दिसत होती. कतरिना आणि रणबीरने उघडपणे कधीही त्यांच्यातील प्रेमपूर्ण संबंधांची कबुली दिलेली नसली, तरी या तथाकथित प्रेमीयुगलाला अनेकवेळा एकत्र वेळ घालविताना पाहण्यात आले आहे. दोघांनी नव्या घरात प्रवेश केल्याचे वृत्तदेखील माध्यमातून झळकले होते.
kat-ranbir-450

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2015 12:07 pm

Web Title: katrina kaif flaunts a huge rock is that her engagement ring
Next Stories
1 अभिषेक, जॉन अब्राहम ‘हेरा फेरी ३’ साठी सज्ज
2 मैं शमिताभ!
3 २१ वा वार्षिक लाइफ ओके स्क्रीन पुरस्कार सोहळा
Just Now!
X