07 March 2021

News Flash

‘भारत’च्या चित्रिकरणादरम्यान कतरिनाला दुखापत

अॅक्शन सीन शूट करत असताना कतरिना जखमी झाली आहे.

कतरिना कैफ

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी भारत या चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. मात्र चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री कतरिना कैफ जखमी झाल्यामुळे चित्रिकरणमध्येच थांबलं आहे.

‘भारत’च्या सेटवर एक अॅक्शन सीन शूट करत असताना कतरिनाच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. या दुखापतीमुळे तिला चित्रिकरण करणं कठीण झालं असून डॉक्टरांनी तिला विश्रांती घेण्यास सांगितलं आहे. त्यामुळे काही काळ चित्रिकरण थांबविण्यात आलं आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच भारतचा टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये सलमानने नौदलातील अधिकाऱ्यापासून सर्कसमधील स्टंटमॅनपर्यंतची विविध रुपे साकारल्याचं पाहायला मिळालं. हा चित्रपट हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेतही रिलीज होणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 8:11 am

Web Title: katrina kaif injured at bharat set
Next Stories
1 साजिद, नानांवरील आरोपांचा ‘हाऊसफुल ४’ वर परिणाम नाही- क्रिती
2 आर्ची देणार १२वीची परीक्षा; महाविद्यालयाने केली पोलीस बंदोबस्ताची मागणी
3 Video : पुलवामा हल्ल्याबाबत शोक व्यक्त करणाऱ्यांना मल्लिका दुआ म्हणते…
Just Now!
X