News Flash

कतरिना कैफला आता अभिनयाचीही संधी!

बॉलीवूडची सौंदर्यवती कतरिना कैफ हिचा अभिनय आणि हिंदी संवादफेक याबाबत बऱ्याच काळापासून प्रश्नचिन्ह लागले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूम थ्री’द्वारे ती

| August 2, 2014 04:09 am

बॉलीवूडची सौंदर्यवती कतरिना कैफ हिचा अभिनय आणि हिंदी संवादफेक याबाबत बऱ्याच काळापासून प्रश्नचिन्ह लागले आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूम थ्री’द्वारे ती प्रेक्षकांसमोर आली होती. आता ‘बँग बँग’ या चित्रपटाद्वारे ऑक्टोबरमध्ये ती पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सोनाक्षी सिन्हाप्रमाणेच कतरिनालाही प्रमुख नायिकेच्या व्यक्तिरेखा मिळाल्या असल्या तरी तिच्या अभिनयापेक्षा सौंदर्यावरच तिचा चाहतावर्ग टिकून आहे. नायककेंद्री चित्रपटांमधूनच प्रामुख्याने कतरिना झळकली आहे. परंतु, आता तिला अभिनयाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे दिसते. ‘कहानी’ या गाजलेल्या चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक सुजॉय घोष आणखी एक स्त्रीकेंद्री चित्रपट बनविणार असून त्यामध्ये कतरिना कैफला प्रमुख भूमिका मिळणार आहे, अशी वदंता आहे. त्यामुळे संपूर्ण लांबीची प्रमुख स्त्रीकेंद्री व्यक्तिरेखा साकारण्याची संधी कतरिनाला मिळणार असून तिला अभिनयही करावा लागणार आहे. या भूमिकेमुळे तिच्या अभिनयकौशल्याबद्दल निर्माण झालेले प्रश्नचिन्ह खोडून काढण्याची संधी तिला मिळणार आहे, असे समजते.
‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या जपानी कादंबरीवर आधारित सुजॉय घोषचा हा आगामी चित्रपट असून त्याचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कतरिनाचा सांभाळ आणि पालनपोषण तिच्या आईने एकटीने केले आहे. कतरिनाच्या बालपणीच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळे वडिलांशी तिचा कधीच संबंध आलेला नाही. कतरिनासकट तिच्या सर्व बहीण-भावंडांचा सांभाळ तिच्या आईनेच केला असून कदाचित हीच गोष्ट सुजॉय घोषच्या चित्रपटात कतरिनाला भूमिका मिळण्यासाठी कारणीभूत ठरली असावी. कारण या आगामी चित्रपटातही प्रमुख भूमिका साकारणारी स्त्री व्यक्तिरेखा ही आईचीच असून ‘सिंगल मदर’च्या या भूमिकेसाठी म्हणूनच कतरिना कैफची निवड झाली असावी असे बॉलीवूडकरांमध्ये बोलले जाते. बॉलीवूडमध्ये अभिनेत्रीला व्यावसायिक यश आणि चाहत्यांचे उदंड प्रेम मिळाले असले तरी शेवटी अभिनयकौशल्य दाखविण्याची संधी मिळतेच असे नाही. परंतु, कतरिना कैफला या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या सौंदर्यगुणांसोबतच अभिनयगुण दाखविण्याची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता हे आव्हान ती पेलू शकेल का नाही याची चर्चा रंगणार आहे हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2014 4:09 am

Web Title: katrina kaif is excited to work with kahaani director sujoy ghosh
टॅग : Katrina Kaif
Next Stories
1 घुमान साहित्य संमेलन बोधचिन्हात अभंगाचे सुलेखन
2 ‘एसीपी प्रद्युम्न’ यांच्या भेटीसाठी इंदूरहून मुलाचे पलायन!
3 पाहाः आमिरच्या ‘पीके’ चित्रपटाचे थक्क करणारे पोस्टर
Just Now!
X