News Flash

कतरिनाचा विषय निघताच सलमान म्हणतो….

मैत्रीचं नातं मात्र सलमाननं पुरेपुर जपलं

सलमान म्हणतो कतरिना ही खूपच साधी मुलगी आहे.

सलमान आणि कतरिना यांची ‘अधुरी प्रेमकहाणी’ सगळ्यांनाच ठावूक असेल. बॉलिवूडची दारं कतरिनासाठी खुली करण्यात सलमानचा वाटा मोठा होता. त्याकाळी कतरिना सलमान खानच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या. त्यानंतर कतरिना रणबीर कपूरसोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली. पण असं असलं तरी सलमान आणि कतरिनाच्या नात्यात कधीही दूरावा आला नाही. किंबहुना अनेकदा सलमानला तिच्याविषयी विचारले असता त्यानं कतरिनाची बाजूच घेतली. या दोघांमधलं प्रेमाचं नातं केव्हाच संपलं असलं तरी मैत्रीचं नातं मात्र सलमाननं पुरेपुर जपलं आहे.

वाचा : कपिलला अजूनही सलतंय सुनील नसल्याचं दु:ख

वाचा : ‘मुस्लिमांनी कृष्णाची भूमिका साकारणं गैर’, आमिरच्या चित्रपटावरून ‘महाभारत’

वाचा : #MeToo मोहिमेला ऐश्वर्याचा पाठिंबा, खुलेपणानं बोलण्याचं महिलांना आवाहन

नुकत्याच एका मुलाखतीत सलमानला कतरिनाविषयी विचारले असता त्यानं पुन्हा एकदा तिचं भरभरून कौतुक केलं आहे. कतरिना ही खूपच साधी मुलगी आहे. तिला कोणत्याच बाबतीत अहंकार नाही. अभिनय, नृत्य सगळ्याच बाबतीत ती वरचढ आहे. एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती त्यात स्वत:चे १०० टक्के देते. डान्स शोसाठी देखील तिला दिवसातून किमान चार तास मेहनत करताना मी तिला पाहिलं आहे.’ अस म्हणत सलमानने पुन्हा एकदा कतरिनाचं भरभरून कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 12:29 pm

Web Title: katrina kaif is very simple girl says salman khan
Next Stories
1 MTV Roadies फेम रघू रामच्या आयुष्यात परतलं प्रेम
2 खोटे निघाले या अभिनेत्रीच्या निधनाचे वृत्त
3 कपिलला अजूनही सलतंय सुनील नसल्याचं दु:ख
Just Now!
X