सलमान खान त्याच्या आगामी बहुचर्चित ठरत असलेल्या ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण माल्टा येथे सुर होणार असल्यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम माल्टामध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला ऐनवेळी अभिनेत्री प्रियांका चोपडाने सोडचिठ्ठी दिल्यामुळे कतरिना कैफची वर्णी लागली आहे.

‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आल्यामुळे प्रेक्षकांमध्ये या  चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच विनोदवीर सुनील ग्रोवर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. काही दिवसापूर्वी सुनीलने माल्टामधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.  त्यामुळे चित्रपटाची संपूर्ण टीम माल्टामध्ये पोहोचल्याचं दिसून येत आहे. यातच आता अभिनेत्री कतरिना कैफने माल्टामधील एक नवा फोटो शेअर केला आहे.

Malta

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

कतरिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती नव्या रुपात दिसत असून कदाचित चित्रपटामध्ये ती याच लूकमध्ये दिसून येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सुनीलनंतर कतरिनाचा फोटो शेअर झाल्यामुळे ‘भारत’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे.

कतरिनाने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत असून तिची केशभूषाही बदलल्याचं दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत तिने माल्टामध्ये चित्रीकरण सुरु झाल्याचं नमूद केलं आहे.

दरम्यान, अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’मध्ये सलमान खान, कतरिना कैफ, दिशा पटानी , सुनील ग्रोवर या सारखे कलाकार झळकणार असून हा चित्रपट २०१९ मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.