13 August 2020

News Flash

अंध छायाचित्रकाराने टिपले कतरिनाचे सौंदर्य

बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कतरिना कैफची छायाचित्रे मनमोहक असतात. फोटोशूट करताना कॅमऱ्यालादेखील भुरळ पडावी

| January 21, 2015 03:08 am

katrina-kaif-450बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कतरिना कैफची छायाचित्रे मनमोहक असतात. फोटोशूट करताना कॅमऱ्यालादेखील भुरळ पडावी, अशा या लावण्यवतीने अलीकडेच एका साबणाच्या ब्रॅण्डसाठी फोटोशूट केले. हे फोटोशूट नेहमीप्रमाणे नसून खास होते. २०१४ साली भावेश पटेल या अंध छायाचित्रकाराला कतरिनाची छायाचित्रे काढण्याची संधी देण्यात आली. भावेश पटेलने केलेले कतरिनाचे फोटोशूट खचितच सुंदर झाले आहे. कतरिनाची अनेक सुंदर छायाचित्रे काढलेल्या भावेशचे छायाचित्रणातील कौशल्य अचंबित करणारे आहे. खुद्द कतरिनादेखील भावेशने काढलेली तिची सुंदर छायाचित्रे पाहून भारावून गेली. स्त्रीचे सौदर्य हे केवळ दिसण्यात नसून, तिच्या स्त्रीपणात असल्याचे भावेशचे मानणे आहे. या फोटोशूटचा भावस्पर्शी व्हिडिओसुद्धा तयार करण्यात आला आहे.

katrina-kaif-450akatrina-kaif-embed-450

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2015 3:08 am

Web Title: katrina kaif looks beautiful in pics clicked by a visually impaired photographer
Next Stories
1 संगीतकार इलायाराजांच्या नावावर १००० चित्रपट!
2 पाहा: अमिताभ आणि धनुषच्या अभिनयाची जुगलबंदी
3 संजय गुप्तांच्या ‘जजबा’तून प्रिया बॅनर्जीचे बॉलिवूड पदार्पण
Just Now!
X