News Flash

रणवीरच्या अतरंगी फॅशन सेन्सविषयी कतरिना म्हणते..

रणवीरला तिने सल्लाही दिला.

कतरिना कैफ, रणवीर सिंग

बॉलिवूड कलाकारांच्या मुलाखती आणि त्यातून समोर आलेलं गॉसिप यासाठी निर्मात- दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा शो प्रसिद्ध होता. त्यानंतर अभिनेत्री नेहा धुपियाचा ‘नो फिल्टर नेहा’ चांगलाच चर्चेत आला. नामवंत बॉलिवूड कलाकारांच्या मुलाखती प्रेक्षकांना आवडू लागल्या. ‘नो फिल्टर नेहा’च्या यशानंतर आता पुन्हा एकदा नेहाचा टीव्ही चॅट शो ‘Vogue BFFs’ गाजतोय. आतापर्यंत या शोमध्ये दीपिका पदुकोण आणि तिची बहिण, राजकुमार राव आणि राधिका आपटे, करण जोहर आणि श्वेता बच्चन या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यानंतर कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या बी टाऊनच्या मैत्रिणी शोमध्ये झळकल्या. दोघींनी बऱ्याच गप्पा मारल्या आणि विशेष म्हणजे प्रसारमाध्यमांसमोर कमी व्यक्त होणाऱ्या कतरिनाने या शोमध्ये काही रंजक खुलासे केले.

‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार कतरिनाने या शोमध्ये रणवीर सिंग आणि क्रिती सनॉन यांच्या ‘फॅशन सेन्स’विषयी काही वक्तव्ये केली. बॉलिवूडच्या कोणत्या कलाकाराचा फॅशन सेन्स तुला आवडत नाही असा प्रश्न तिला नेहाने विचारला असता क्षणाचाही विलंब न करता तिने रणवीर सिंगचे नाव घेतले. त्याचप्रमाणे विचित्र डिझाइनचे कपडे परिधान न करण्याचा सल्लाही तिने रणवीरला दिला.

विशेष म्हणजे अभिनेत्री क्रिती सनॉनविषयी तिला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा कतरिनाला तिचे नावसुद्धा नीट उच्चारता आले नाही. या शोमध्ये तू कोणत्या व्यक्तीसोबत येऊ इच्छित नाही असा प्रश्न नेहाने विचारला. सुरुवातीला उत्तर देण्यास ती टाळत होती. नंतर आलियाने तिला क्रितीचे नाव घेण्यास सुचवले. कतरिनाने मान्य केले पण क्रितीऐवजी तिने किर्ती असा उल्लेख केला.

वाचा : फेब्रुवारीत प्रदर्शित होणार हे दमदार चित्रपट

कतरिना सहसा कोणत्याही कलाकारावर थेट निशाणा साधत नाही. पण या शोमध्ये तिने अगदी मोजक्या शब्दांत काही रंजक खुलासे केले. लवकरच हा एपिसोड छोट्या पडद्यावर प्रसारित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 3:25 pm

Web Title: katrina kaif makes interesting revelation on ranveer singh fashion sense and kriti sanon
Next Stories
1 फेब्रुवारीत प्रदर्शित होणार हे दमदार चित्रपट
2 झीनत अमान यांना अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्या व्यावसायिकाला अटक
3 Video: ‘वीरे की वेडिंग’मध्ये दिसेल जिमी शेरगिलचा अनोखा अंदाज
Just Now!
X