News Flash

पुढच्यावेळी मॅचिंग बिकनी घालीन – कतरिना कैफ

रणबीर आणि कतरिना सुट्टीची मजा घेत असतानाचे खासगी क्षणांचे फोटो माध्यमांत प्रसिद्ध झाल्याने कतरिना माध्यमांवर भडकली होती.

| November 15, 2013 05:48 am


रणबीर आणि कतरिना सुट्टीची मजा घेत असतानाचे खासगी क्षणांचे फोटो माध्यमांत प्रसिद्ध झाल्याने कतरिना माध्यमांवर भडकली होती. या विषयीची आपली नाराजी तिने लेखी निवेदनाद्वारे माध्यमांना कळवली होती. आता पुन्हा एकदा ‘धूम ३’ चित्रपटातील गाण्याच्या अनावरणाच्या वेळी माध्यामांच्या प्रतिनिधींनी याच विषयावर तिला छेडले असता ती म्हणाली, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही सर्वजण अशाप्रकारचे फोटो काढणार असाल, तेव्हा मला अधी कल्पना द्या, म्हणजे मी मॅचिंग बिकनी घालण्याची काळजी घेईन. पांढऱ्यावर लाल रंग शोभून दिसत नाही.
कतरिना म्हणाली, गेल्या नऊ वर्षांत माझ्याबरोबर असे कधीच झाले नव्हते. कोणीतरी जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याची माझी भावना होती. माध्यमांनी केलेले बरोबर असले, तरी या घटनेमुळे मी व्यथित झाले होते, त्यामुळे यावरची माझी प्रतिक्रिया देखील योग्य होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 5:48 am

Web Title: katrina kaif on bikini pics with ranbir kapoor i will wear matching next
Next Stories
1 आमिरला बनायचयं मास्टर ब्लास्टर
2 सनी देओलचे छोट्या पडद्यावर पदार्पण
3 लोकांना मी गर्विष्ठ का वाटते?- करिना
Just Now!
X