28 February 2021

News Flash

Video: कतरिना- आमिरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

हा व्हिडिओ एका दिवसातच १५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला

आमिर खान नुकताच १४ मार्चला ५३ वर्षांचा झाला. वाढदिवसाच्या दिवशी त्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. यात फातिमा सना शेख, प्रीति झिंटा, माधुरी दीक्षित आणि सचिन तेंडुलकरसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता. पण कतरिनाने मात्र आमिरला हटके शुभेच्छा दिल्या. कतरिनाने सोशल मीडियावर आमिरसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघंही एका गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका दिवसातच १५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला.

हा व्हिडिओ शेअर करताना कतरिनाने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अजून पुष्कळदा आपल्याला एकत्र नाचायचे आहे. इन्स्टाग्रामवर तुझं स्वागत आहे.’ डान्सचा सराव करताना कतरिना आणि आमिरने ट्रॅक सूट आणि टी-शर्ट घातलं आहे. आमिरच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर त्याचा हा लूक ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ सिनेमातील आहे. आमिरने या सिनेमासाठी केस आणि दाढी वाढवली आहे. आमिरने त्याच्या वाढदिवसाला चाहत्यांना इन्स्टाग्रामवर येऊन अनोखी भेट दिली.

कतरिना- आमिरच्या व्हिडिओला त्यांच्या चाहत्यांनी अनेक कमेंटही केल्या. एका युझरने लिहिले की, ‘तुमची कला अवर्णनीय आहे, तुम्ही उत्तम नृत्यही करतात. देव तुमची अशीच प्रगती करत राहो.’ तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, ‘तुमचा डान्स कौतुकास्पद आहे.’ ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’मध्ये आमिर खानसोबत कतरिना कैफ, फातिमा सना शेख आणि अमिताभ बच्चन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यशराजची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य करत आहेत. यावर्षी दिवाळीमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कथा १८३९ मध्ये प्रकाशित झालेल्या फिलिप मीडोज टेलरचे पुस्तक ‘कनफेशन्स ऑफ ए ठग’ या पुस्तकावर आधारित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 2:44 pm

Web Title: katrina kaif posted a dance video with aamir khan goes viral on social media watch video
Next Stories
1 VIDEO : …म्हणून व्हायरल होतोय आलियाच्या बालपणीचा व्हिडिओ
2 Video : १, २, ३…. आणि ‘मोहिनी’ परत आलीये..
3 …म्हणून प्रिया वारियर मोबाइल वापरत नाही
Just Now!
X