20 October 2020

News Flash

आमिरची उंची

आमिरचाही मिश्कील स्वभाव जागा झाला आणि ‘कॉम्प्लेन पीने लगा हूँ’ असे उत्तर त्याने दिले.

आमिर खान, कतरिना कैफ

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ असलेला आमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटात अभिनयाची ‘उंची’ गाठतो. मात्र आमिरची खरीखुरी उंची फार नाही, हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. कतरिना कैफ म्हणजेच आपल्या कॅटने नुकताच इन्स्टाग्रामवर टाकलेल्या एका फोटोत मात्र आमिर कॅटपेक्षाही उंच दिसतोय.

वाचा : सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे सेलिब्रिटी कपलच्या नात्यात तणाव

आता कॅट बॉलीवूडमधील सर्वाधिक उंच अभिनेत्रींपैकी एक. आमिर तर तिच्यापेक्षाही ठेंगू. त्यामुळे हा फोटो पाहून दोघांचेही चाहते गोंधळात पडले. आमिरने कोणत्या प्रकारचे हिल वापरले, का तो उंच पायरीवर उभा आहे, कतरिना सेल्फी काढताना वाकली तर नसेल ना.. अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती चाहत्यांनी त्यांच्यावर केली. मग आमिरचाही मिश्कील स्वभाव जागा झाला आणि ‘कॉम्प्लेन पीने लगा हूँ’ असे उत्तर त्याने दिले. शारीरिक उंचीबाबत बोलायचे झाल्यास आमिरला कतरिनाची उंची गाठणे आता अशक्य आहे. पण अभिनयाच्या उंचीत आमिरला गाठणं कतरिनाला शक्य होईल का, हा खरा प्रश्न आहे.

वाचा : जाणून घ्या, अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ची पहिल्या दिवसाची कमाई

आमिर आणि कतरिना सध्या त्यांच्या आगामी ठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. यात अमिताभ बच्चन आणि फातिमा सना शेख यांच्याही भूमिका आहेत. नुकतेच आमिर, कतरिना आणि फातिमाने चित्रपटातील एका गाण्यासाठी नृत्याचा सराव केला. त्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 2:57 pm

Web Title: katrina kaif posted a selfie with aamir khan people are confused and questioning it
Next Stories
1 सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे सेलिब्रिटी कपलच्या नात्यात तणाव
2 व्हॅलेंटाइन व्हाया ‘What’s up लग्न’
3 PadMan box office collection day 1: जाणून घ्या, अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ची पहिल्या दिवसाची कमाई
Just Now!
X