News Flash

रोमॅण्टिक हॉलिडेसाठी कॅट-रणबीर जाणार युरोपला?

बॉलीवूडमधील हॉट जोडी रणबीर आणि कतरिना त्यांच्या कामामधून वेळ काढून युरोपला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

| July 2, 2013 05:50 am

बॉलीवूडमधील हॉट जोडी रणबीर आणि कतरिना त्यांच्या कामामधून वेळ काढून युरोपला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. रणबीर-कतरिना युरोपला सुट्टी साजरी करण्यासाठी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघेही ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीची युरोपमध्ये भेट घेणार आहेत. अयान त्याच्या मित्रमंडळींसोबत युरोपला गेला आहे.
रणबीर आणि कतरिना हे अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीमध्येही एकत्र दिसले होते. मात्र, आमच्या दोघांमध्ये  केवळ मैत्रीपूर्ण असल्याचे कतरिनाचे म्हणणे आहे. ‘धूम ३’च्या चित्रिकरणावेळी झालेल्या दुखापतीमुळे सध्या कतरिनाने चित्रिकरणातून सुट्टी घेतली आहे. तर रणबीरने ‘बेशरम’ चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच पूर्ण केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 5:50 am

Web Title: katrina kaif ranbir kapoor going to europe on a romantic holiday
Next Stories
1 प्रकाश झा बनले अमिताभसाठी ड्रेस डिझायनर
2 ‘रामलीला’मध्ये माधुरीचे आयटम सॉंग?
3 ‘जेम्स बॉंन्ड’च्या मुलीचा अंडाशयासंबंधीच्या कर्करोगाने मृत्यू
Just Now!
X