News Flash

…म्हणून ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’मध्ये सर्वात छोटी भूमिका कतरिनाच्या वाट्याला

फातिमाच्या अनेक फोटोंमध्ये ती कतरिनासारखीच दिसते

टायगर जिंदा है सिनेमात अफलातून अॅक्शन सीन करणारी कतरिना कैफ लवकरच ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमातील कतरिनाची भूमिका काय असेल यावरुन तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. पण तिच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या सिनेमात कतरिनाची भूमिका फारच लहान आहे. आश्चर्य म्हणजे अभिनेत्री फातिमा सना शेखपेक्षाही कतरिनाची भूमिका लहान आहे. कतरिनाशिवाय या सिनेमात आमिर खान, अमिताभ बच्चन आणि फातिमाच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

आमिरने एका मुलाखतीत हे स्पष्ट केले होते की, या सिनेमात कतरिनाची मुख्य भूमिका नसेल. कतरिनानेही तिच्या भूमिकेचे समर्थन करताना म्हटले होते की, ‘भूमिकेची लांबी किती आहे यापेक्षा ती भूमिका महत्त्वपूर्ण आहे की नाही हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं असतं. मला या प्रोजेक्टमध्ये काम करायला फार आवडतंय. फक्त मलाच नाही तर खुद्द अमिताभ, आमिर आणि फातिमालाही या प्रोजेक्टवर काम करायला मजा येतेय. हा संपूर्ण सिनेमा आमिर आणि विक्टरचा आहे. त्यांना वाटेल तेव्हा ते या सिनेमाशी निगडीत गोष्टी समोर आणू शकतात.’

फातिमाला इंडस्ट्रीमध्ये कतरिनाची जुळी बहिणच मानतात. फातिमाच्या अनेक फोटोंमध्ये ती कतरिनासारखीच दिसते. एकीकडे आमिरचा नथ घातलेला लूक व्हायरल होत आहे तर दुसरीकडे कतरिनाचे बोल्ड फोटो व्हायरल होत आहेत. म्हणूनच सिनेमात कलाकारांचा लूक कसा असणार याबद्दल अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत. सिनेमात जॅकी श्रॉफ आणि शशांक अरोडा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असतील. ८ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 11:19 am

Web Title: katrina kaif responded to rumours of her role being shorter than co star fatima sana shaikh in aamir khan film thugs of hindostan
Next Stories
1 नाटय़ परिषद पंचवार्षिक निवडणूक : मोहन जोशी यांचा अर्ज बाद
2 कॅन्सरवर मात केलेला हा बॉडी बिल्डर लवकरच मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला
3 पुरुषांचा स्टॅमिना वाढवणारा व्हायग्रा टॅक्स फ्री पण..
Just Now!
X