कतरिना कैफ ही सध्याची बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री. सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत कतरिना गणली जाते. मात्र तरीही गेल्या दहा वर्षांत कोणीही मला डेटसाठी विचारलं नाही याची खंत ती बोलून दाखवते. तिनं उघड केलेल्या गुपीतावर कोणाचाही विश्वास बसत नसला तरी शपथेवर गेल्या दहा वर्षांत एकानंही आपल्याला डेटसाठी विचारलं नाही असं ती सांगते.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या लव्हलाईफबद्दल सांगितलं. या गोष्टीवर कोणालाही विश्वास बसणार नाही मात्र मला कोणीही डेटसाठी गेल्या दहा वर्षात विचारलं नाही असं ती म्हणाली. आश्चर्य म्हणजे कतरिना ही वर्षभरापूर्वी अभिनेता रणबीर कपूरला डेट करत होती.  ‘अजब प्रेम की गजब’ कहाणीपासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रेमप्रकरणाला जग्गा जासूसच्या सेटवर पूर्णविराम मिळाला. दुर्दैव म्हणजे त्यानंतर काही महिन्यातच रणबीर कतरिनाची जीवलग मैत्रीण आलियाला डेट करू लागला. या नात्यामुळे कतरिना आलियाच्या मैत्रीत कायमचा दुरावा आला असंही म्हटलं गेलं. त्याआधी कतरिनाचं नाव सलमानसोबतही जोडलं गेलं होतं. इतकंच नाही तर सलमान कतरिनाशी लग्न करणार अशाही चर्चा होत्या. या गोष्टी जगजाहीर असताना कतरिनानं मात्र दहा वर्षांत कोणीही डेटसाठी विचारलं नसल्याचं सांगिल्यानं सगळ्यांच्या भुवया आश्चर्यानं उंचावल्या. कतरिना नुकतीच शाहरूख खानच्या ‘झिरो’ चित्रपटात झळकली. या चित्रपटात तिची भूमिका लहान असली तरी तिच्या मेहनतीला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली.