News Flash

४४ डिग्री तापमानात शूट करताना अशी दिसतेय कतरिना

बदलाशी जुळवून घेणं कलाकारांना नेहमीच त्रासदायक ठरतं

कतरिना कैफ

कतरिना कैफ ही तिच्या सिनेमांसाठी जेवढी प्रसिद्ध आहे तेवढीच प्रसिद्ध ती तिच्या लूकसाठीही आहे. तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्यामुळेच तिने तिचा कोणताही फोटो सोशल मीडियावर शेअर केला की थोड्याच वेळात त्याला लाखो लाइक्स आणि शेअर्स येतात.
सध्या कतरिना तिचा आगामी ‘टायगर जिंदा है’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. वेगवेगळ्या देशांत या सिनेमाचे चित्रीकरण होत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या वातावरणामध्ये बदल होत असतात. या बदलाशी जुळवून घेणं कलाकारांना नेहमीच त्रासदायक ठरतं.

कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘४४ डिग्री सेल्शियसमध्ये ‘टायगर जिंदा है’चं शूट सुरू आहे,’ असं म्हंटलं आहे. या फोटोमध्ये तिचा चेहरा पूर्ण घामाने भिजलेला दिसतोय. तिच्या या फोटोंकडे पाहून तिथे अंगाची किती लाही होत असेल याचा अंदाज नक्कीच येईल. तिने शेअर केलेल्या या फोटोंमध्येही ती कमालिची मादक दिसते हे मात्र नक्की. मोरोक्कोमधील चित्रीकरण संपल्यावर आता सलमान आणि कतरिना अबूधाबीसाठी रवाना होणार आहेत.

‘टायगर जिंदा है’ हा सिनेमा २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ सिनेमाचा सिक्वल आहे. ‘एक था टायगर’चे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. तर ‘टायगर जिंदा है’च्या दिग्दर्शनाची धुरा अब्बास जफरने सांभाळली आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर कतरिना लगेच आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. याचसोबत शाहरूखबरोबरही ती आनंद एल रॉयच्या सिनेमात काम करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 1:54 pm

Web Title: katrina kaif share photos katrina kaif tiger zinda hai sets katrina shooting katrina salman khan
Next Stories
1 Raksha Bandhan 2017: …म्हणून हेमा मालिनीने रजनीकांत यांना चक्क राखी बांधली
2 ..म्हणून साराला मुलांपासून दूर ठेवण्याचा अमृता करतेय प्रयत्न
3 अमिताभ बच्चन यांच्यासोबत हिंदी सिनेमा करण्यास नागराज मंजुळे सज्ज?
Just Now!
X