News Flash

कतरिनाने शेअर केला तिचा डायट प्लान, नेटकरी झाले खूश

जाणून घ्या कतरिनाच्या फिटनेस विषयी...

अत्यंत कमी वेळात आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. तिने बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये स्वत:चे स्थान मिळवले आहे. कतरिनाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. फॅशनसेन्स, उत्तम अभिनयशैली, उत्तम नृत्यकला आणि चेहऱ्यावरील गोड हास्यामुळे तिने अनेकांच्या मनात घर केले आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. कतरिनाच्या फिटनेसचे रहस्य काय आहे? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच असतो. आता कतरिनाने तिचे डायट प्लॅन तिच्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट स्टोरीवर एक फोटो शेअर करत तिचे डायट शेअर केले आहे. कतरिनाचे दुपारचे जेवण बघून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. फोटोला कॅप्शन देत कतरिना म्हणाली, “आजचे दुपारचे जेवण वांग्याचे भरीत, दाळ चीला, पालक दाळ आणि शिमला बटाटा आहे” अस कॅप्शन कतरिनाने त्या फोटोला दिले आहे.

कतरिनाचा आगामी चित्रपट ‘सुर्यवंशी’ आहे. हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतू करोनामुळे प्रदर्शानाची तारिख पुढे ढकलण्यात आली असून हा चित्रपट मार्च मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना सोबत अक्षय कूमार मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 10:33 am

Web Title: katrina kaif shared her lunch photo went viral dcp 98
Next Stories
1 स्त्री वेशातील ‘या’ अभिनेत्याला ओळखलं का?
2 ‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद; पत्नीसाठी कपिलने घेतला महत्त्वाचा निर्णय
3 वाहिनीसाहेबांच्या घरी युवराजांचे आगमन; धनश्री काडगांवकरला पुत्ररत्न
Just Now!
X