News Flash

कतरिनाने मारले सुनील ग्रोव्हरच्या थोबाडीत, सलमान झाला खूश

सध्या सलमान खान व कतरिना कैफ आगामी 'भारत' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहेत

कतरिना कैफ, सलमान खान, सुनील ग्रोव्हर

सध्या सलमान खान व कतरिना कैफ आगामी ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहेत. ‘भारत’ ५ जून म्हणजेच ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना व सलमानसोबत अभिनेता सुनील ग्रोव्हर पहिल्यांदाच काम करत आहे.

नुकतंच एका मुलाखतीत सुनील ग्रोव्हरने संगितले की, “सलमान व कतरिनासोबत काम करताना मला खूप मजा आली.” त्याने शूटींदरम्यानचा एक किस्सा सुद्धा यावेळेस सांगितला. सुनीलने सांगितले की, “चित्रपटात एका सीनमध्ये कतरिना मला थोबाडीत मारते. हा सीन शूट करताना सलमान खूप हसत होता कारण आवेशात कतरिनाने मला खरंच जोरात मारले होते.”

याच मुलाखतीत कतरिनाने सांगितले की,”सुनील ग्रोव्हर उत्तम माणूस व एक खरा कलाकार आहे.” या दोघांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर नव्याने वायरल होतोय. या व्हिडिओमध्ये कतरिना सुनीलचे फोटो काढताना दिसतेय. या दोघांच्या जोडीला चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद आहे. चित्रपटाबरोबरच खऱ्या आयुष्यातही त्यांची मैत्री तितकीच खास आहे.

२०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर भारत आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. ‘भारत’मध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2019 5:17 pm

Web Title: katrina kaif slaps sunil grover salman khan
Next Stories
1 आमिर खानच्या ऑफीससमोर चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
2 पत्नीला खूश करण्यासाठी रितेशची नवी हेअरस्टाइल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
3 Photo : लहानग्या तैमुरचा टॅटू पाहिलात का ?
Just Now!
X