26 September 2020

News Flash

फिटनेससाठी कतरिनाला गुरु मिळतात तेव्हा…

यास्मिन कराचीवालासोबत कतरिनाची फिटनेस ट्रेनिंग सुरू

अभिनेत्री कतरिना कैफ, फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला

फिटनेसच्या बाबतीत बॉलिवूड कलाकार नेहमीच सजग असतात. आपल्या शरीरयष्टीकडे, फिटनेसकडे या कलाकारांना विशेष लक्ष द्यावं लागतं. भूमिकेच्या गरजेनुसार त्यांना वजन वाढवावं लागतं किंवा कमी करावं लागतं. मात्र हे सर्व करण्यासाठी खूप मेहनत, एकाग्रता आणि त्यासोबतच योग्य मार्गदर्शनाचीही गरज असते. हे फिटनेस ट्रेनर जणू पडद्यामागचे हिरोच असतात. फिटनेस ट्रेनर्सचा विषय काढण्यामागे कारण असं आहे की अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केलाय. या व्हिडिओमध्ये ती सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालासोबत ‘पिलेट्स ट्रेनिंग’ घेताना दिसतेय.

बी- टाऊनमधील जवळपास सर्वच कलाकारांना यास्मिन कराचीवालाने फिटनेस ट्रेनिंग दिली आहे. या यादीत करिना कपूर खान, बिपाशा बासू, दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्रींचा समावेश आहे. ‘पिलेट्स’ या व्यायाम प्रकारात यास्मिनला २० वर्षांचा अनुभव आहे. म्हणूनच कतरिना तिला ‘मास्टर ट्रेनर’ म्हणतेय. या व्हिडिओमध्ये कॅट बरीच मेहनत घेताना दिसतेय. सलमान खानसोबत ‘टायगर जिंदा है’ चित्रपटात ती भूमिका साकारणार आहे. यामध्ये ती काही स्टंट्स करतानाही दिसणार आहे. म्हणूनच तिची ही ट्रेनिंग सुरु केली आहे असंही म्हटलं जातंय.

वाचा : ‘या’ अटीवर करिनाने सैफशी बांधली लग्नगाठ

कतरिना तिच्या चित्रपटात डमी न वापरता स्वत:च स्टंट्स करते. ‘धूम ३’ असो किंवा ‘बँग बँग’ कतरिनाचे स्टंट्स पाहून प्रेक्षक नेहमीच आश्चर्यचकित होतात. यासाठी ती तिच्या फिटनेसवर जास्त भर देताना दिसतेय. तिच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाचं मोरोक्कोमधील शूटींग पूर्ण झालं असून, आता संपूर्ण टीम अबू धाबीला पोहोचली आहे. सलमान आणि कतरिनाच्या या चित्रपटाविषयी अनेकांनाच उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 6:34 pm

Web Title: katrina kaif taking pilates training from yasmin karachiwala video posted on her instagram
Next Stories
1 VIDEO : ‘डॅडी’मध्ये वाहणार गणेशोत्सवाचे वारे
2 ‘साहो’साठी प्रभासला मिळालं ‘बाहुबली २’पेक्षा जास्त मानधन?
3 … म्हणून दिव्यांकाला मुलीचं मातृत्त्व नकोय
Just Now!
X