19 October 2019

News Flash

‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत कतरिनाची जमणार ऑनस्क्रीन जोडी

कतरिनाने हा चित्रपट साईन केला तर तिचा हा तिसरा तेलुगू चित्रपट ठरणार आहे.

बॉलिवूडमधल्या ग्लॅमरस अभिनेत्रीपैकी एक म्हणून कतरिना कैफने चंदेरी दुनियेमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं. केवळ हिंदीच नव्हे तर दक्षिणेकडेदेखील तिची क्रेझ पाहायला मिळते. तिच्या याच लोकप्रियतेमुळे ती लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून तिला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळणार आहे.

कतरिना सध्या सलमानच्या बहुप्रतिक्षित ठरत असलेल्या ‘भारत’ चित्रपटामध्ये व्यस्त असून या चित्रपटानंतर ती चित्रपट दिग्दर्शक सुकुमार यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू स्क्रीन शेअर करणार असून ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

सध्या या चित्रपटाविषयी केवळ चर्चा सुरु असून अद्याप या चित्रपटाचं नाव निश्चित झालेलं नाही. मात्र या चित्रपटामध्ये कतरिना आणि महेश बाबू हे प्रमुख भूमिकेत असावे अशी चित्रपट दिग्दर्शकांची इच्छा असून त्यांनी याप्रकरणी दोन्ही कलाकारांकडे विचारणादेखील केली आहे. विशेष म्हणजे महेश बाबूने या चित्रपटासाठी होकार कळविला असून कतरिनाने मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, जर कतरिनाने हा चित्रपट साईन केला तर १० वर्षांमध्ये तिचा हा तिसरा तेलुगू चित्रपट ठरणार आहे. यापूर्वी कतरिनाने व्यंकटेश दुग्गुबती यांच्या ‘मल्लिकाश्वरी’ आणि नंदमूरी बालकृष्ण यांच्या ‘अलारी पिडुगु’ या चित्रपटामध्ये काम केलं आहे.

First Published on January 12, 2019 12:44 pm

Web Title: katrina kaif to cast opposite south actor in filmmaker sukumars next