हिंदी चित्रपटातील सध्याची आघाडीची अभिनेत्री आणि मॉडेल म्हणजे कतरिना कैफ. कतरिनाने ‘बूम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नव्हता. मात्र कतरिनाच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली होती. तिच्या अभिनय कौशल्यामुळे तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळत गेल्या. आतापर्यंत विविध चित्रपटांमध्ये झळकली कतरिना लवकरच एका बायोपिकमध्ये झळकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कतरिना लवकरच सलमान खानच्या ‘भारत’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटानंतर तिच्याकडे ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट असून या चित्रपटामध्ये तिच्यासोबत अक्षय कुमार स्क्रीन शेअर करणार आहे. विशेष म्हणजे या दोन चित्रपटांव्यतिरिक्त ती लवकर अर्जुन पुरस्कार विजेती भारताची सुवर्ण कन्या पी.टी.उषा यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. या बायोपिकसाठी कतरिनाला विचारणा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

२०१७ पासून पी.टी. उषा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असल्याची चर्चा होती.मात्र काही कारणास्तव हा बायोपिकचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. आता हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दिग्दर्शख रेवती एस.वर्मा यांनी या बायोपिकसाठी कंबर कसली आहे.

दरम्यान, रेवती यांनी या बायोपिकसाठी कतरिनाला पहिली पसंती दिली आहे. रेवतीने कतरिनासोबत अनेकदा चर्चा केली. दोन दिवसांपूर्वीच रेवतीने कतरिनाची भेट घेत कथेवर चर्चा केली. मात्र अद्याप तरी कतरिनाने या चित्रपटासाठी होकार कळविला नाही. पी.टी. उषा यांच्यावर आधारित हा बायोपिक इंग्लिश, हिंदीसह चीनी, रशियन शिवाय अन्य भारतीय भाषांत प्रदर्शित करण्याची योजना आहे.