02 December 2020

News Flash

कतरिनाचा घायाळ करणारा ‘हा’ फोटो पाहिलात का?

सोशल मीडियावर रंगलीये कतरिनाच्या फोटोची चर्चा

उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील मनमोहक हास्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. कतरिना सोशल मीडियावर सक्रिय असून सतत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.त्यामुळे बऱ्याचदा कतरिना तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे सध्या सर्वत्र तिची चर्चा रंगली असून अभिनेत्री आलिया भट्टनेदेखील तिच्या फोटोवर भन्नाट कमेंट केली आहे.

लॉकडाउनच्या मोठ्या कालावधीनंतर आता हळूहळू सगळं पूर्वपदावर येताना दिसत आहे. त्यामुळे कलाविश्वानेदेखील जोर धरला आहे. अनेक चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यात कतरिनादेखील तिच्या आगामी चित्रपटाकडे वळली आहे. सध्या कतरिना मालदीवमध्ये तिच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण करत असून येथील काही फोटो तिने शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

So amzinggg to be in Maldivesfor shoot #lovemyjob #grateful

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

मालदीवमध्ये चित्रीकरण सुरु असल्यामुळे खूप आनंदी आहे, असं कॅप्शन कतरिनाने या फोटोला दिलं आहे. त्यामुळे कतरिनाच्या आगामी प्रोजेक्टचं चित्रीकरण मालदीवला होत असल्याचं चाहत्यांना समजलं आहे. त्यामुळे अनेकांनी तिला कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये आलियानेदेखील कमेंट करत सुंदर असं म्हटलं आहे.

दरम्यान, लॉकडाउननंतर कतरिना पहिल्यांदाच चित्रीकरणासाठी बाहेर पडली आहे. लवकरच ती सूर्यवंशी आणि फोन भूत या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 4:21 pm

Web Title: katrina kaif vacation in maldives shared beautiful photos dcp 98 ssj 93
Next Stories
1 ‘विवाह’मधल्या भूमिकेसाठी अमृता रावला द्यावी लागली होती ‘ही’ परीक्षा
2 ‘स्कूबी डू’चे निर्माते काळाच्या पडद्याआड; उपचारादरम्यान झालं निधन
3 अभिनेत्री वैदेही परशुरामी ठरली ‘युवा तेजस्वी चेहरा’
Just Now!
X