23 October 2018

News Flash

बॉलिवूड पदार्पणापूर्वीच कतरिनाच्या बहिणीचे नखरे!

लॅक्मे या प्रसिद्ध ब्रॅण्डसाठी इसाबेलची निवड करण्यात आली आहे.

कतरिना कैफ, इसाबेल कैफ

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या कतरिना कैफची बहिण इसाबेल बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवण्यास सज्ज झाली आहे. लवकरच चित्रपटसृष्टीत इसाबेल पदार्पण करणार आहे. पण या झगमगाटाच्या दुनियेत पाऊल टाकण्यापूर्वीच इसाबेलने नखरे दाखवण्यास सुरुवात केल्याचे दिसते आणि याच कारणामुळे ती आता चर्चेत आली आहे.

वाचा : आणखी एका अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा?

लॅक्मे या प्रसिद्ध ब्रॅण्डसाठी इसाबेलची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात या भावी अभिनेत्रीने काहीही कारण नसताना माध्यमांशी संवाद साधण्यास टाळाटाळ केली. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, तिला आजूबाजूला असलेल्या लाइट्सचा त्रास होत होता. याचीच तक्रार करण्यात तिने जवळपास एक तास घालवला. त्यानंतर तिला साध्या लाइट्सच्या उजेडात शूट करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे शूटची वेळ आणखी लांबणीवर गेली. एका मोठ्या ब्रॅण्डसाठी काम करण्याची इसाबेलची ही पहिलीच वेळ असल्यामुळे तिचे असे वागणे चर्चेचे कारण झाले.

Mukkabaaz movie review वाचा : जातिभेदाचे सत्य उलगडणारा दणकट ठोसा

दरम्यान, बॉलिवूडबद्दलही इसाबेलला काहीच बोलण्याची इच्छा नव्हती. बॉलिवूडबद्दल प्रसार माध्यमे मला प्रश्न विचारणार नाहीत याची काळजी घ्या, असे तिने तिच्या टीमला निक्षून सांगितले होते. इतकेच नव्हे तर वृत्तपत्रांसोबत मुलाखती सुरु असताना ती अर्ध्यावरूनच तेथून निघून गेली.

First Published on January 13, 2018 11:42 am

Web Title: katrina kaif wont be happy sister isabelle kaif thrown a pointless tantrum at a recent event