28 February 2021

News Flash

कतरिनाची बहीण लवकरच बॉलिवूडमध्ये; चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

सूरज पांचोलीसोबत करणार स्क्रीन शेअर

सौजन्यः ट्विटर

आपल्या मनमोहक अदांनी आणि नृत्यकलेने अनेकांच्या मनावर जादू करणारी अभिनेत्री कतरिना कैफ कायमच चर्चेत असते. पण सध्या मात्र चर्चा आहे कतरिनाची बहीण इसाबेल हिची. इसाबेल आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. नुकतंच तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. टी सीरीजनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

‘टाईम टू डान्स’ या आगामी चित्रपटात इसाबेल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत अभिनेता सूरज पांचोली स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट १२ मार्च २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरसोबतच दोन्ही कलाकारांचे लूक्सही टी सीरीजने शेअर केले आहेत.

पोस्टरवरून आणि नावावरून तरी हा चित्रपट डान्सशी संबंधित असेल असं दिसतंय. या पोस्टरवर “When life is put to the test, it’s time to dance.” अशी ओळही लिहिली आहे. यावरून आपण अंदाज लावू शकतो की हा चित्रपट डान्स स्पर्धेशी संबंधित असू शकेल.

या चित्रपटाची निर्माती कोरिओग्राफर रेमो डिसूझा याची पत्नी लिझेल डिसूझा आहे तर कोरिओग्राफर स्टॅनली डिकोस्टा हा या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय.

या व्यतिरिक्त सुस्वागतम खुशामदीद या चित्रपटातही अभिनेता पुलकीत सम्राटसोबत इसाबेल काम करत आहे. तसंच गेल्या वर्षी कतरिनाने इसाबेलच्या एका नव्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं होतं. मात्र, करोना महामारी आणि त्यामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. निर्मात्यांकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:37 pm

Web Title: katrina kaifs sister to be starred in upcoming film vsk 98
Next Stories
1 शाल्व-शुभांगी गोखलेंची ‘पावरी’; शेअर केला मजेशीर व्हिडीओ
2 विरुष्काच्या घरी नाही एकही नोकर?; ‘ही’ व्यक्ती करते सगळं काम
3 टेलिव्हिनच्या हॅण्डसम बॉयचा बर्थडे; मालदीवमध्ये करणचं सेलिब्रेशन
Just Now!
X