28 October 2020

News Flash

Corona Effect: पहिल्यांदा केबीसीमध्ये करण्यात आले ‘हे’ मोठे बदल

करोनामुळे यंदा केबीसीमध्ये पहिल्यांदा होणार मोठे बदल

माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेला हा शो टीआरपी यादीमध्ये टॉप १०मध्ये असतो. यंदा करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे कौन बनेगा करोडपती १२मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. शोच्या क्रिएटीव्ह प्रोड्युसर सुजाता संघमित्र यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला या संदर्भात नुकतीच मुलाखत दिली. त्यांनी यावेळी शोमध्ये नेमके शोमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत या संदर्भात माहिती दिली आहे. चला जाणून घेऊया शोमध्ये काय असणार बदल…

>यंदा कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाही. पण हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी IPLमध्ये देण्यात आलेला प्रेक्षकांचा आवाज एपिसोड एडीट करताना देण्यात येणार आहे.

>सेटवर प्रेक्षक नसल्यामुळे ‘ऑडियन्स पोल’ ही लाइफलाइन काढण्यात आली आहे. त्या जागी आता ‘व्हिडीओ फ्रेंड’ ही जुनी लाइफलाइन पुन्हा स्पर्धकाला खेळताना वापरता येणार आहे.

>’flip the question’ ही देखील नवी लाइफलाइन देण्यात आली आहे.

>आता स्पर्धकाला ११ ऑप्शन असणार आहेत. त्यामध्ये ‘my city, my state’ ही नवी कॅटेगिरी अॅड करण्यात आली आहे.

>पहिल्या पाच प्रश्नांसाठी स्पर्धकाला ४५ सेकंदाची वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर पुढच्या पाच प्रश्नांसाठी ६० सेकंदाची वेळ देण्यात येणार आहे.

>व्हिडीओ कॉलवर प्रश्न विचारण्यासाठी देण्यात येणारी वेळ वाढवण्यात आली आहे. आता स्पर्धकाला ४५ सेकंद मिळणार आहेत.

>दर वेळी शोमध्ये फास्टेस्ट फिंगरमध्ये १० असतात. पण यंदा ८ असणार आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी स्पर्धकांची संख्या कमी करण्यात आली आहे.

>हॉट सीटवर बसणारा स्पर्धक आणि बिग बीं यांच्यामधील अंतर वाढवण्यात आले आहे.

>शोमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकाची निवड केल्यानंतर त्याला मुंबईमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंतर शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्याची करोना चाचणी करण्यात येणार आहे.

>घर बसल्या केबीसी पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील SonyLIV या अॅपद्वारे शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

>दररोज १० प्रेक्षकांना एक लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त कार, टीव्हीसेट, मोबाईल फोन अशा अनेक बक्षिसे प्रेक्षकांना जिंकण्याची संधी मिळणार आहे.

KBC: अमिताभ यांचे कंप्युटरजी आहेत खास, स्पर्धकाला प्रश्न विचारताना काय दाखवतात ठाऊक आहे?

आज २८ सप्टेंबर रोजी केबीसीचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 12:49 pm

Web Title: kaun banega croreopati 12 whats new on amitabh bachchans show avb 95
Next Stories
1 ‘दिल चाहता है’मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट
2 ‘मिर्झापूर २’ची उत्सुकता वाढली; नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
3 कोरिओग्राफर टेरेन्सने नोरा फतेहीसोबत केले गैरवर्तन?
Just Now!
X