02 March 2021

News Flash

Kaun Banega Crorepati : पतीच्या स्वप्नासाठी जगणारी उपजिल्हाधिकारी

शारीरिकदृष्ट्या व्यंग असलेल्या अनुराधाला वॉकरच्या साहाय्याने चालावे लागते.

अनुराधा अग्रवाल

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाने बऱ्याच जणांचे आयुष्य बदलले. २००० साली सुरु झालेल्या या कार्यक्रमाने टेलिव्हिजन विश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात केली ही बाब कदाचित नाकारता येणार नाही. ‘नमश्कार देवीयों और सज्जनो, मै अमिताभ बच्चन…’ असं म्हणत बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतात. यंदा या कार्यक्रमाचे नववे पर्व आहे. बुधवारी झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या भागात शारीरिकदृष्ट्या व्यंग असलेल्या सरकारी कर्मचारी अनुराधा अग्रवाल हिला हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली.

वाचा : ..म्हणून झरीनवर आली बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्याची वेळ

छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी असलेल्या अनुराधा हिच्या संघर्षाची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. अनुराधाचे लग्न झाले असून, तिला पाच वर्षांची मुलगी आहे. खरंतर प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. मात्र, अनुराधाच्या बाबतीत अगदी उलट घडलेय. तिच्या यशामागे तिचा पती दिनदयाल अग्रवाल याचा हात आहे. दिनदयालने तिला केवळ तिचे शिक्षणच पूर्ण करू दिले नाही. तर घरातील सर्व कामांची संपूर्ण जबाबदारीही त्याने स्वतःच्या खांद्यांवर घेतली. यासाठी अनुराधा तिच्या पतीचे नेहमीच आभार मानते.

अनुराधा केवळ दोन वर्षांची असताना तिला पोलिओने ग्रासले. तिला पती दिनदयालचा नेहमीच खंबीर पाठिंबा मिळाल्यामुळे आज ती स्वतःचे करिअर घडवू शकतेय. ‘केबीसी’मध्ये मोठी रक्कम जिंकण्याची संधी मिळाल्यास त्या पैशांचा वापर ती पतीच्या उज्ज्वल भविष्यासाठी करणार असल्याचे तिने कार्यक्रमात सांगितले. तसेच, तिला या पैश्यांतून कर्करोगग्रस्त असलेल्या तिच्या भावावरही उपचार करायचे आहेत.

वाचा : ‘खतरो के खिलाडी ८’ या तीन सेलिब्रिटींमध्ये होणार अंतिम टक्कर

‘केबीसी’त जिंकलेल्या रकमेचे रोकडीत रुपांतर करताना आलेल्या अडथळ्यामुळे काही दिवसांपूर्वी अनुराधा चर्चेत आली होती. त्यानंतर छत्तीसगड सरकारने सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेचा पाठिंबा मिळवला आणि तिला मिळालेला धनादेशाचे रोख रक्कमेत रुपांतर करण्याची परवानगी मिळवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 3:39 pm

Web Title: kaun banega crorepati 9 amitabh bachchan deputy collector anuradha agarwal wants to shape husbands career with her winning amount
Next Stories
1 अबब! प्रियांकाच्या या ड्रेसची एवढी किंमत
2 ..म्हणून झरीनवर आली बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करण्याची वेळ
3 प्रियांका चोप्राचा नोबेल विजेत्या मलालासोबत ‘फॅन मुमेन्ट’
Just Now!
X