महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत भारतीयांची मनं जिंकली. भारतात परतल्यावर या महिला खेळाडू सध्या मान सन्मान घेण्यामध्येच व्यग्र आहेत. आता लवकरच त्या ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये दिसणार आहेत. महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज आणि तिची टीम या शोमध्ये सहभागी झाले. या कार्यक्रमाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं असून, याचे प्रक्षेपण १ सप्टेंबरला सोनी टीव्हीवरुन केले जाणार आहे.

‘टॉयलेट- एक प्रेम कथा’साठी अक्षय- रणवीरने केला ‘चीप डान्स’

या कार्यक्रमात महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजसह इतर सात खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमात मितालीच्या टीमने एकूण ६ लाख ४० हजार रुपये जिंकले. जिंकलेली ही सर्व रक्कम हैदराबाद येथील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या ‘प्रयास’ या संस्थेला देण्यात येणार आहे.

महिला अत्याचाराविरोधात काम करणाऱ्या ‘प्रयास’ या स्वयंसेवी संस्थेची मिताली राज ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. या संस्थेला आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यात मितालीसह हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णामूर्ती, स्मृती मंधाना, पूनम राऊत, झूलन गोस्वामी आणि दीप्ती शर्मा यांनी सहभाग घेतला.

नवाजच्या या ‘बाळगोपाळा’वरून नजर हटत नाही

अमिताभ बच्चन यांनी पूजा करुन केबीसीच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आणि दुसऱ्या दिवशी महिला क्रिकेट टीमसोबत चित्रीकरण सुरू केलं. बिग बींनी सुरुवातीला या खेळाडूंचं कौतुक करत, ओळख करुन दिली. त्यानंतर प्रत्येकीला दोन दोनच्या टीममध्ये विभागून खेळण्याची संधी दिली. शेवटी मिताली राज दोनदा खेळली.