X
X

‘या’ कारणामुळे बच्चन कुटुंबीय कधीच KBCमध्ये येणार नाही

READ IN APP

बच्चन कुटुंबीय या कार्यक्रमामध्ये सहभागी न होण्यामागे एक कारण आहे

बॉलिवूडचा शहेनशाहा अर्थात अमिताभ बच्चन यांचे चित्रपट जेवढे प्रसिद्ध तेवढाच त्यांनी सूत्रसंचालन केलेला ‘कौन बनेगा करोडपती’सारखा कार्यक्रमही प्रसिद्ध आहे. किंबहुना, त्यांनी हा शो इतका उंचीवर नेऊन ठेवला आहे की या शोमधील हॉट सीटवर त्यांच्या व्यतिरिक्त प्रेक्षक अन्य कोणाला पाहू शकत नाही. अनेकांना करोडपती होण्याची स्वप्नं दाखवणाऱ्या आणि कित्येकांच्या स्वप्नांना नवी प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आजवर अनेक जणांनी हजेरी लावली. या शोमध्ये सामान्य जनतेपासून ते अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला. मात्र आतापर्यंत बिग बींच्या कुटुंबातील म्हणजेच बच्चन परिवारातील एकाही सदस्याने या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली नाही. विशेष म्हणजे बच्चन कुटुंबीयांचा या कार्यक्रमामध्ये सहभाग न घेण्यामागे एक खास कारण आहे.

‘कौन बनेगा करोडपती’चं ११ वं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही दिवसापूर्वी या कार्यक्रमासंदर्भात एका पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बिग बींनी कार्यक्रमाशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यातच माझ्या घरातील कोणताही सदस्य या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकत नाही, असं खुद्द अमिताभ यांनी सांगितलं. त्यासोबतच त्या मागचं कारणही स्पष्ट केलं.

वाचा : घटस्फोटानंतर रश्मी देसाई करतेय ‘या’ अभिनेत्याला डेट

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामध्ये आजवर अनेकांनी सहभाग घेतला आहे. मात्र बच्चन कुटुंबातील एकही सदस्य या मंचावर कधीच आलेला नाही. त्यामुळे अनेक वेळा चाहत्यांमधून हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र बच्चन कुटुंबीय इच्छ असताना सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे काही नियम आहेत आणि या नियमांमुळेच बच्चन कुटुंबातील एकही सदस्य या कार्यक्रमात येऊ शकत नाही. केवळ त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन असेल तर त्याचवेळी ते या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात. मात्र कोणताही खेळ खेळू शकत नाहीत.

दरम्यान, या कार्यक्रमाने अनेकांची स्वप्न पूर्ण केली. तर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. मनोरंजन करण्यासोबतच या कार्यक्रमातून ज्ञानदेखील देण्यात येतं. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाला मिळणारी पसंती पाहता बऱ्याच प्रसिद्ध मालिकांनाही या कार्यक्रमाने मागे टाकलं आहे.

 

24
X