‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘दस का दम’ या प्रसिद्ध क्विझ शोचा निर्माता सिद्धार्थ बासू ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात काम करताना दिसणार आहे. अनुराग कश्यपचा हा चित्रपट ५०च्या दशकातील काळावर आधारित असून, यात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जॉन अब्राहम आणि नर्गिस फाखरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या शूजित सिरकरच्या ‘मद्रास कॅफे’ चित्रपटाद्वारे सिद्धार्थ बासू अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘बॉम्बे वेल्वेट’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत गुप्तता बाळगण्यात आली आहे. या चित्रपटात करण जोहर देखील एका नकारात्मक भूमिकेत दिसेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 6, 2013 11:32 am