19 March 2019

News Flash

… म्हणून कौशल इनामदारने पुण्यातील त्या कॅफेवर टाकला बहिष्कार!

प्रियांकाच्या 'क्वांटिको'तील हिंदू टेररच्या कथानकावरून हा वाद सुरू झाला.

कौशल इनामदार

अमेरिकन मालिका ‘क्वांटिको’ गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेच्या लोकप्रियतेत बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्राचा सिंहाचा वाटा आहे. मात्र १ जून रोजी प्रसारित झालेल्या भागावरून प्रियांका आणि मालिकेच्या निर्मात्यांवर जोरदार टीका होऊ लागली आहे. मालिकेतील हिंदू टेररच्या कथानकावरून हा वाद सुरू झाला आणि आता इस्लामविरोधी टिप्पणी केल्याने एका प्रसिद्ध शेफला त्याची नोकरी गमवावी लागली आहे. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर आता संगीतकार कौशल इनामदारने जे.डब्यू मॅरिएट हॉटेल्सवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

दुबईतील जेडब्ल्यू मॅरिएट मार्किस हॉटेलच्या रंग महल रेस्तराँचे शेफ अतुल कोचर यांनी ‘क्वांटिको’विरोधात ट्विटरवर राग व्यक्त केला. ‘गेल्या २००० वर्षांपासून इस्लामच्या दहशतीच्या सावटाखाली राहणाऱ्या हिंदूंच्या भावनांचा तू सन्मान केला नाहीस. तुला लाज वाटली पाहिजे,’ असं ट्विट कोचर यांनी केलं. या ट्विटवरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आणि अनेकांनी त्यांना कामावरून काढून टाकण्याची मागणी केली. अखेर माफी मागितल्यानंतरही कोचर यांना हॉटेल मालकांनी बडतर्फ केलं. याचाच निषेध करत कौशल इनामदारने जे.डब्यू मॅरिएट हॉटेल्सवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा : ‘आपला मानूस’च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार ‘ही’ अभिनेत्री?

‘हे सर्व संतापजनक आहे. मी पुण्यात नेहमी जे.डब्ल्यू मॅरिएट कॉफी शॉपमध्ये जाणं पसंत करत होतो. मात्र या घटनेनंतर मी बहिष्कार टाकत आहे. जिथे तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते अशा ठिकाणी खाणं-पिणं मी पसंत करणार नाही,’ असं ट्विट कौशलने केलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच गदा आणणारा निर्णय या हॉटेल मालकांकडून घेण्यात आल्याने कौशल इनामदारने ट्विटरवर राग व्यक्त केला आहे.

First Published on June 13, 2018 7:25 pm

Web Title: kaushal inamdar boycotts jwmarriott after chef atul kochhar sacked quantico row priyanka chopra