23 January 2021

News Flash

VIDEO: बिग बॉसच्या घरात धक्काबुक्की; कविता-एजाजमधील भांडण पोहोचलं शिगेला

एजाज आणि कवितामधील भांडण पोहोचलं विकोपाला

‘बिग बॉस’च्या १४ व्या सिझनला मोठ्या धुमधड्यात सुरुवात झाली आहे. हा रिअॅलिटी शो सुरु होऊन आता चार आठवडे उलटून गेले आहेत. परिणामी या शोमधील सर्व स्पर्धक घरात टिकून राहण्यासाठी एकमेंकांविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान हे शाब्दिक भांडण आता धक्काबुक्की पर्यंत पोहोचलं आहे. अभिनेत्री कविता कौशिक आणि एजाज खान या दोघांमध्ये जोरदार जोरदार धक्काबुक्की झाली.

अवश्य पाहा – ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर मराठी कलाकाराची टीका

कविता एजाजवर टीका करत होती. तेवढ्यात संतापलेल्या एजाजने तिला जोरदार धक्का मारला. त्यांची ही धक्काबुक्की मारामारीमध्ये बदलणार एवढ्यात घरातील इतर स्पर्धक मध्ये पडले अन् त्यांनी दोघांना दूर नेले. त्यांच्या या भांडणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिग बॉस कविताला पाठिंबा देताना दिसत आहेत.

अवश्य पाहा – VIDEO: कर्करोगग्रस्त अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; चाहत्यांकडे मागितली आर्थिक मदत

 

View this post on Instagram

 

A post shared by Kavita Kaushik (@ikavitakaushik)

अवश्य पाहा – साडीमध्ये खुललं अमृताचं सौंदर्य; पाहा अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा

यापूर्वी देखील कविता आणि एजाजमध्ये जोरदार भांडण झालं त्यावेळी तर तिने थेट बिग बॉसवरच फिक्सिंगचे आरोप केले होते. “मी एजाजला सतत संभाळून घेतलं. त्याच्यासाठी जेवण केलं. परंतु बिग बॉसने यापैकी काहीच दाखवलं नाही. माझी चांगली बाजू त्यांनी दाखवली नाही. बिग बॉसने केवळ निक्की तांबोळीला जिंकवावं. एजाजला आणि पवित्राला पाठिंबा द्यावा. इथे सर्व काही आधिच फिक्स झालेलं दिसतंय. मला इथे आता राहण्याची इच्छा उरलेली नाही.” असं म्हणत तिने आपला संताप व्यक्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 6:04 pm

Web Title: kavita kaushik eijaz khan bigg boss 14 mppg 94
Next Stories
1 ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर किल्याची सुंदर प्रतिकृती
2 विकी कौशल करणार ‘शुभ आरंभ’; शेअर केला हा खास फोटो
3 सुदाननं रचला विक्रम; पहिल्यांदाच ऑस्करच्या शर्यतीत झळकतोय ‘हा’ चित्रपट
Just Now!
X