26 February 2021

News Flash

‘या’ व्यक्तीमुळे कविता कौशिक झाली Bigg Boss 14 मध्ये सहभागी

...म्हणून कविता कौशिकने घेतला Bigg Boss 14 मध्ये येण्याचा निर्णय

छोट्या पडद्यावर सर्वाधिक चर्चेत राहणारा बिग बॉस या शोचं यंदाचं १४ वं पर्व चांगलंच चर्चेत आलं आहे. जुन्या आणि नव्या स्पर्धकांसह या शोमध्ये रोज नवनवीन वाद, टास्क प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. यामध्येच आता टीव्ही विश्वातील बिनधास्त गर्ल कविता कौशिक हिने बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली आहे. त्यामुळे सध्या हा शो रंजक वळणावर आल्याचं दिसून येत आहे. मात्र, कविता एका खास व्यक्तीच्या सांगण्यावरुन या शोमध्ये सहभागी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अलिकडेच कविता कौशिकने वाइल्ड कार्डच्या माध्यमातून बिग बॉस 14 मध्ये प्रवेश मिळवला आहे. खरं तर बिग बॉसच्या एक्स स्पर्धक काम्या पंजाबीच्या सांगण्यावरुन कविताने या शोमध्ये हजेरी लावली आहे.

बिग बॉस 14 मध्ये सहभागी होण्यासाठी काम्या पंजाबीने कविताला प्रोत्साहित केलं होतं. तिने बिग बॉसच्या घरात तिला आलेले अनुभव कविताला सांगितले होते. त्यामुळे कवितानेदेखील या शोमध्ये सहभागी व्हावं अशी काम्याची इच्छा होती. एका मुलाखतीत कविताने याविषयी सांगितलं.

बिग बॉस 13 साठी कविताला ऑफर मिळाली होती. मात्र, त्यावेळी तिने हा शो करण्यास नकार दिला होता.मात्र, यावेळी काम्याच्या सांगण्यावरुन तिने या शोमध्ये सहभागी झाली. दरम्यान, बिग बॉसच्या घरात पदार्पण करताच कविताने कॅप्टनशीप मिळववली आहे.त्यामुळे घरात सहभागी झाल्यापासून सोशल मीडियामध्ये कविताच्या टास्क खेळण्याच्या पद्धतीची चर्चा रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 11:05 am

Web Title: kavita kaushik reveals who motivated her to participate in bigg boss 14 ssj 93
Next Stories
1 कॉलेजमध्ये रणवीर सिंहच्या गर्लफ्रेंडला डेट करण्याविषयी आदित्य रॉय कपूरने केला खुलासा
2 बिग बी ठरले सर्वांत आदरणीय सेलिब्रिटी तर सर्वांत आकर्षक सेलिब्रिटी ठरली…
3 मलायका- अर्जुनच्या नात्यावर अनिल कपूरची झक्कास कमेंट
Just Now!
X