23 January 2021

News Flash

‘बिग बॉस’मध्ये जाऊन आदर गमावलास म्हणणाऱ्यांना कविताचं सडेतोड उत्तर

कविता बिग बॉस १४ची स्पर्धक होती.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ बिग बॉसचे १४ वे पर्व सध्या चर्चेत आहे. त्याची एक स्पर्धक कविता कौशिक बिग बॉस १४ मध्ये केलेल्या तिच्या वक्तव्यामुळे अजूनही चर्चेत आहे. कविता यामुळे सतत ट्रोल होत आहे.

कविता आणि तिच्या पतीने अभिनव शुक्लावर आरोप केले की अभिनवने रात्री उशिरा तिला मद्यधुंद अवस्थेत फोन करून त्रास दिला. त्यामुळे ती सतत ट्रोल होत असते. आता ट्विटरवर कविताला एका नेटकऱ्याने म्हटले की, “बिग बॉसच्या घरात जाऊन तू संपूर्ण आदर गमावला आहेस.” नेटकऱ्याला उत्तर देत कविता म्हणाली, “क्यू भाई? मी काही खोटं प्रेम केलं का? माझ्या लग्नाच्या काही गोष्टी सांगितल्या का? किंवा खोट रडगाणं केलं का? जर हे सगळं करून आदर मिळतो तर मला त्याची गरज नाही”

कविता दोन वेळा बिग बॉसच्या घरातून बाहेर आली आहे. पहिल्यांदा तिला कमी मतं मिळाल्यामुळे तर दुसऱ्यांदा रूबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला सोबत झालेल्या भांडणामुळे. शोमध्ये कविता आणि इतर  स्पर्धक एजाज खान, रूबिना- अभिनव यांच्यात सतत वाद व्हायचे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 5:33 pm

Web Title: kavita kaushik slams fan who says she has lost all respect after bigg boss 14 exit dcp 98
Next Stories
1 “समंथा कुठे आहे?”; संतापलेले नेटकरी ‘सेक्स अँड द सीटी’चा ट्रेलर करतायेत ट्रोल
2 ‘द फॅमिली मॅन २’चा टीझर प्रदर्शित, या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 ‘तिचा भूतकाळच तिचे भविष्य वाचवू शकतो’, परिणीती चोप्राच्या ‘द गर्ल ऑन ट्रेन’चा टीझर प्रदर्शित
Just Now!
X