आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे देऊन करोडपची बनता आलं तर? कल्पनेतील ही गोष्ट कौन बनेगा करोडपती या शोमुळे मागच्या काही वर्षांपासून पूर्ण होत आहे. नुकताच या शोच्या दहाव्या भागाचा निकाल लागला असून त्यामध्ये बिनीता जैन यशस्वी झाल्या आहेत. त्यामुळे आता त्या एक करोड रुपयांच्या मालक झाल्या आहे. कोट्यवधी रुपये कमावण्याबरोबरच बिग बींसोबत वावरायला मिळणार असल्याने अनेकांनी या शोमध्ये येण्याचे स्वप्न पाहिले होते. यातील काहींचे नशीब पालटले, त्यातच आता जैन यांचा समावेश झाला आहे. आसाममधील गुवाहटी येथील जैन या शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या असून त्यांनी कोरडपती होण्याचा मान मिळवला आहे.

आता यानंतर त्यांना ७ कोटींसाठीचा प्रश्न विचारला जाणार आहे. त्या प्रश्नाचे उत्तर त्या योग्य पद्धतीने देतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा भाग २ ऑक्टोबर रोजी प्रसारित होणार असून यामध्ये कोणता प्रश्न विचारला जाणार आणि त्याचे उत्तर जैन यांना देता येणार का यासाठी काहीशी वाट पहावी लागणार आहे. आता हा भाग झाल्यावर पुढचा भाग कधी असणार, त्यात कोणाला एन्ट्री मिळणार यांसारख्या गोष्टींबाबतही केबीसीच्या चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे.